Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांकडे आणखी एक मोठी जबाबदारी; अजितदादांनी 20 वर्षे कारभार सांभाळलेल्या 'या' मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Sunetra Pawar Elected Pune Education Board President : अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली, तसेच बीड आणि पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
DCM Sunetra Pawar
DCM Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 01 March: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सभासदांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड झाली. यापूर्वी हे पद अजित पवारांकडे होते. अजित पवार गेल्या २० वर्षापासून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार केला.

अद्ययावत इमारती बांधल्या आणि एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर नुकतीच त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली, तसेच बीड आणि पुणे जिल्ह्यांचे पालकमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

DCM Sunetra Pawar
सम्राट मोहम्मद रझा पहलवी विरोधी लढा ते इराणचे सर्वोच्च नेते : अयातुल्ला अली खामेनी यांचा राजकीय प्रवास

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदासह विविध संस्थांमधील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. आता पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे. आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी प्रथमच जिल्हा शिक्षण मंडळाचा आढावा घेतला. मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि भविष्यातील योजना जाणून घेतल्या. तसेच यावेळी दादांचे काम आणखी पुढे नेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

DCM Sunetra Pawar
Shivsena UBT vs BJP : दोन मुलींच्या जन्मात केवळ 15 दिवसांचं अंतर! सोमय्यांनी लावून धरलेल्या बनावट जन्म दाखला प्रकरणात भाजप नगरसेवकच अडकणार

दरम्यान या बैठकीनंतर सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे कार्यालयात जाऊन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विविध पंचायत समितीच्या सभापती निवडी बाबतच्या बैठकींना उपस्थिती लावणार होत्या .मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबईतील संभाव्य दौऱ्यामुळे त्या तातडीने मुंबईला रवाना झाल्या आहेत.

तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ नेते आमदार आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला निवडून आलेल्या सदस्यांची बैठक होत आहे. या बैठकीतच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि विविध पंचायत समितीचे सभापती पदाचे उमेदवार निवडले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com