Sunetra Pawar : अजितदादांच्या जाण्याचं राजकारण करू नका, सुनेत्रा पवारांनी सुनावलं; तपास यंत्रणांवर विश्वास!

Ajit Pawar Sunetra Pawar Supriya Sule : अजित पवार यांच्या जाण्याचे राजकारण करू नये, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News : अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या घटनेच्या तपासाची दिशा काय आहे, त्यात नेमके काय समोर आले, याची माहिती आम्हाला अद्याप मिळत नाही. आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष आम्ही गमावला आहे. त्यांना न्याय मिळणार कधी? भाऊ आमचा गेला आणि सत्ता मात्र ते उपभोगत आहेत,’ असा संतप्त सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष सध्या सत्तेत सहभागी असूनही त्यांच्या पक्षातील मंत्री आणि आमदार या प्रकरणावर ठामपणे बोलत नसल्याची टीकाही त्यांनी केली होती.

यावर पत्रकारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विचारले असता अजितदादांच्या मृत्यूवर राजकारण नको, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, 'खर सांगायचं तर आदरणीय अजितदादा गेल्याचं जी मोकळी निर्माण झालीये आणि आकाश कोसळलं आहे, ते माझ्या आणि माझ्या मुलापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार.'

'दादांच्या या घटनेवरती सर्वांनाच वाटते की आम्हाला निर्णय कळला पाहिजे. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. पंतप्रधानसाहेबांना, आदरनीय गृहमंत्र्यांना सगळ्यांना भेटून आल्याचे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आदरनीय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात शब्द दिल्याचे आपल्याला माहिती आहे. शब्द पाळण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करतायेत. आणि तपास यंत्रानासुद्धा आपलं काम करतीये. माझा तपास यंत्रना, कायदा आणि संविधानाने निर्माण केलेल्या गोष्टींवर विश्वास आहे. आणि मला असं वाटतंय की आपणही त्यांना वेळ दिला पाहिजे.',असे देखील त्यांनी सांगितले.

Sunetra Pawar
Supriya Sule : अजितदादांच्या विमान अपघातावरून सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांच्या नेत्यांवर हल्लाबोल; म्हणाल्या, "आमचा भाऊ गेला अणि हे सत्ता..."

मीडिया ट्रायल होतीये...

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, 'फक्त सतत मीडियात येणं म्हणजे अपडेट मिळणं अस नाही, वारंवार अशा गोष्टी करून मीडिया ट्रायल होतीये, असं मला वाटतंय, त्यासाठी आपल्या सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की दादांची आई, दादांची मुलं आणि मी याच्यापेक्षा त्याच दुखः कोणाला होणार आहे? त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींनी चौकशी व्हावं असं आपलं वाटतंय, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अजितदादांच्या अशा प्रकारे जाण्याचे राजकारण कोणीच करू नये.'

Sunetra Pawar
Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांनो, सावधान! ऑफिसमध्ये रील्स पाहताय? सोशल मीडिया वापरासाठी नवी आचारसंहिता?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com