Supriya Sule : पुणे पूरस्थितीवरून सुप्रिया सुळेंचा संताप, सरकारला धरले जबाबदार; नेमके काय म्हणाल्या?

Pune Flood Update : पुण्यातील पूरस्थिती हाताळण्यात सरकार अयशस्वी झाले आहे. सध्या कामकाजात 10 टक्के फरक पडला आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. प्रशासनाकडून पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काम करण्यात येत आहे. तरी देखील नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे सरकार प्लॅनिंग शून्य सरकार असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पुणे दौऱ्यावर आले असताना सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यातील पूर परिस्थितीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, पूर परिस्थितीच्या नियोजनात यावेळी दहा टक्के सुधारणा दिसत आहेत. पूर परिस्थितीबाबत नागरिकांना सूचित करण्याचे आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पण त्याच ठिकाणी पाणी का साचते, हे विचार करणे गरजेच आहे.

Supriya Sule
Bachchu Kadu Vs Ravi Rana : चंद्रकांतदादांसमोरच बच्चू कडू - रवी राणा भिडले! काय आहे कारण?

उजनी भरले तर पुढे काय, यासाठी एक, दोन महिन्याच प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. परंतु सरकार तात्पुरते नियोजन करताना दिसत आहे. दहा दिवसांपूर्वी आलेल्या पूर परिस्थितीचा अंदाज असताना देखील प्रशासनाने पुढील दोन-तीन महिन्याचं प्लॅनिंग करणे आवश्यक होते. रेड अलर्ट आल्यानंतर प्रशासन जागे झाले आहे. त्यामुळे हे प्लॅनिंग शून्य सरकार असल्याची टीका सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी केली

सचिन वाझे याने जयंत पाटील Jayant Patil यांचे नाव घेतला आहे. यावर आता विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, विधानसभा होईपर्यंत काय काय बोलतील सांगता येत नाही. आता बोलायला काही शिल्लक नाही. भ्रष्टाचाराचे आरोप यापूर्वी ते करायचे, मात्र आता आमच्याबाबत भ्रष्टाचारावर बोलण्यासारखे काहीच राहिले नाही. त्यामुळे नवीन काहीतरी हे काढत आहेत.

मुख्यमंत्री लाडके बहीण योजना महाविकास आघाडीचे सरकार आल्यास बंद करण्यात येईल अशी वक्तव्य काही नेत्यांकडून करण्यात आली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून फेक नरेटिव्हबाबत बोलत आहेत. त्यामुळे अजित पवार आणि छगन भुजबळ यांना विचारणे आवश्यक आहे, की फेक नॅरेटिव्ह कोण करतेय? फेक नॅरेटिव्ह ते चालवतात की आम्ही ,असा सवाल सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचे सरकार आले तर लाडकी बहीण योजना सुधारू आणि महिलांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करू. माविआ सरकार आल्यावर क्राईममुक्त महाराष्ट्र करणार आहोत. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना राज्यातील क्राईम कमी झाला होता. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिला सुरक्षितता आणि सबलीकरणाबाबत अधिक चांगली धोरणे आणणार असल्याचे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Supriya Sule
Video Ajit Pawar : "मग लोकसभेला 'हा' वादा कुठे गेला होता?", अजितदादांनी घेतली कार्यकर्त्यांची फिरकी; नेमकं घडलं काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com