Supriya Sule : सातवेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या सुप्रिया सुळे देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत!

NCP MP Supriya Sule News : जाणून घ्या, हा बहुमान मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना नुकतंच लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यांचा आता देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत समावेश झाल्याचे समोर आले आहे.

या अगोदर सुप्रिया सुळे यांना उत्कृष्ट संसदपटू हा बहुमान मिळालेला आहे. त्यानंतर आता त्यांच्या राजकीय करिअरमध्ये आणखी एका बहुमानाची भर पडली आहे. या बहुमानामुळे सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळाली आहे.

देशातील अग्रणी मासिक 'इंडिया टुडे' ने जाहिर केलेल्या देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीत खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांचा समावेश करण्यात आला आहे. 'इंडिया टुडे'ने देशभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यवसाय आणि अन्य पातळ्यांवर कार्यरत असलेल्या देशभरातील महिलांचा अभ्यास केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Supriya Sule
Ajit Pawar News : लेटरबॉम्ब पडला, भाजप-शिवसेना सदस्यांकडून अजित पवार टार्गेट

संसदेतील त्यांची उपस्थिती, चर्चासत्रांतील सहभाग, विचारलेले प्रश्न, मांडलेली खासगी विधेयके आदी गोष्टींचा विचार करता राष्ट्रवादीच्या(NCP) खासदार सुप्रिया सुळेंना या यादीत स्थान देण्यात आल्याचे समोर आले आहे. या अगोदर त्यांना दोन वेळा संसद महारत्न, सात वेळा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय अन्यही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या या एकूण कार्याची दखल घेत देशभरातील कर्तृत्ववान महिलांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

देशातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या यादीतील स्थान मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आनंद व्यक्त करत, आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा हा बहुमान आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Supriya Sule
Prakash Ambedkar : आंबेडकरांचं 'इंडिया'त सामील होण्यासाठी पत्र, म्हणाले,"मोदींना हटविण्यासाठीच नाहीतर..."

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

'देशातील अग्रणी मासिक 'इंडिया टुडे' यांनी जाहिर केलेल्या 'टॉप १०० वुमन अचिव्हर्स ऑफ इंडिया' या यादीत माझा समावेश करण्यात आला आहे. हा मोठा बहुमान आहे. हे शक्य झाले कारण बारामती लोकसभा मतदार संघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची आणि त्यांची सेवा करण्याची संधी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com