Supriya Sule : 'अहो मुख्यमंत्रीसाहेब... पुण्याकडे लक्ष द्या!'; खासदार सुळे मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र !

Supriya Sule met Pune Municipal Commissioner : कोणतेही नियोजन न करता घाईघाईने केलेला विकास कामांमुळे पुण्याची ही स्थिती झाली आहे. शहरात प्रशासनाकडून नालेसफाई झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात नालेसफाई झालेलीच नाही.
Supriya Sule Visit PMC
Supriya Sule Visit PMCSarkarnama

Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर हे सातत्याने राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे. शहरात गेल्या काही दिवसांत ड्रग्स रॅकेट, कल्याणीनगर अपघात प्रकरण आणि आता मोठ्या प्रमाणात रस्त्यांना आलेलं ओढ्यांचे स्वरूप यासारख्या घटना घडल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी शहरातील पाणी तुंबलेल्या ठिकाणांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेत यावर तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच वेळेत पालिका प्रशासनाकडून उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिला.

पालिका आयुक्तांना भेटल्यानंतर खासदार सुळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे,म्हणाल्या, पुण्यात काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसात खूप ठिकाणी पाणी साठले आहे. या घटना सातत्याने घडत आहे. पाणी तुंबलेल्या ठिकाणांची मंगळवारी आम्ही पाहणी केली. नाल्यावरून रस्ते गेले आहेत, त्यामुळे पाणी जायला जागाच राहिलेली नाही.परिणामी पाणी तुंबत असून लोकांच्या घरांमध्ये पाणी जात आहे.

कोणतेही नियोजन न करता घाईघाईने केलेला विकास कामांमुळे पुण्याची ही स्थिती झाली आहे. शहरात प्रशासनाकडून नालेसफाई झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.मात्र प्रत्यक्षात नालेसफाई झालेलीच नाही.टेंडर होवून देखील नालेसफाई न करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं काम महापालिका का करत नाही, असा सवाल उपस्थित करत नालेसफाईची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

Supriya Sule Visit PMC
Supriya Sule: घर, पक्ष फोडणारे आता आकडेमोड करताहेत; सुप्रिया सुळेंचा रोख फडणवीसांकडे?

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या याबाबतीत मी अभिनंदन करते. एखाद्या ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केलं नाही तर ते संबधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करतात. हीच भूमिका महापालिकेने देखील घेणे आवश्यक आहे. सध्या पुणे हे सातत्याने हेडलाईन मध्ये राहत आहे. ड्रग्स रॅकेट पुण्यात, ड्रग्स प्रकरणातील आरोपी ससून मधूनच पळून जातात.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात देखील ससून मध्ये रक्त बदलले जाते. आणि आता पाणी तुंबून रस्त्यांना ओड्याचं स्वरूप येण्याची घटना देखील पुण्यातच घडत आहे. या सर्वांची नैतिक जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पुण्याकडे लक्ष द्या, अशी विनंती करणार असल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com