Supriya Sule
Supriya SuleSarkarnama

Supriya Sule Mobile Hack : सुप्रिया सुळेंचा फोन कोणी हॅक केला, काय होती हॅकरची मागणी? तपासात मोठी माहिती समोर

Pune Police : तपासात पोलिसांना राष्ट्रवादीच्या इतर तब्बल दहा ते पंधरा पदाधिकाऱ्यांची देखील फोन हॅक झाले असल्याचे समोर आले.
Published on

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक झालेला आहे. याबाबतची माहिती सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर देत पोलिसात तक्रारही दाखल केली होती. यानंतर पोलिस तपासात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

पुणे दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. त्या मेसेजला टिक करताच त्यांचा मोबाईल हॅक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी जयंत पाटील Jayant Patil यांना त्यांच्या नंबरवर मेसेज करण्यास सांगितले. त्यांनी मेसेज केल्यानंतर हॅकरने जयंत पाटील यांच्यासोबत चॅट केल्याचे समोर आले.

त्यानंतर सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी मोबाईल बंद करत सोशल मीडियावर या हॅकिंगबाबत माहिती दिली. तसेच ऑनलाइन स्वरूपात तक्रार देखील दाखल केली. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिस या प्रकरणी तपास करत होते. यवत पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सायंकाळी सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हाट्सअप रिकव्हर करून पुन्हा सुरू करण्यात आला.

सुळेंसह इतर पदाधिकाऱ्यांचेही फोन हॅक

या प्रकरणाची तपासणी करताना पोलिसांना वेगवेगळ्या गोष्टींचा खुलासा झाला आहे. तपास करत असताना पोलिसांना राष्ट्रवादीच्या इतर तब्बल दहा ते पंधरा पदाधिकाऱ्यांची देखील फोन हॅक झाले असल्याचे समोर आले. तसेच त्यांच्याकडे पैशाची मागणी झाल्याचे देखील समोर आली होती.

Supriya Sule
Vijay Wadettiwar : लाडक्या बहिणीवरून रवी राणांचे वादग्रस्त विधान सरकारच्या मनातील; विजय वडेट्टीवार बरसले..

200 डॉलरची मागणी

सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक करणाऱ्याने तब्बल 200 डॉलरची मागणी केली होती. म्हणजेच 16 हजार रुपये मागितले होत. इतर पदाधिकाऱ्यांना देखील 15 ते 20 हजाराची मागणी झाल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

हॅकर बिहारचा?

सुप्रिया सुळे यांचा मोबाईल हॅक झाल्यानंतर त्याचा ट्रॅक काढताना पोलिसांना इतर पदाधिकाऱ्यांच्या देखील फोन हॅक झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हॅकरला ट्रॅक करताना त्यांचे लोकेशन बिहार असल्याच समोर आले. त्यानुसार तपासात हॅकर हा बिहार मधील तरुण असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळेंची पोस्ट

रविवारी दुपारी एकच्या सुमारास सुप्रिया सुळे यांना त्यांचा फोन आणि व्हाट्सअप हॅक झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सोशल मीडिया व प्लॅटफॉर्मवरती याबाबत माहिती दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलिस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.

(Edited by Sunil Dhumal)

Supriya Sule
Congress News : बैल गेला आणि झोपा केला; प्रदेश काँग्रेसला अखेर एकदाची जाग आली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com