Supriya Sule : अजितदादांकडे असलेल्या 'घड्याळ' चिन्हावर सुप्रिया सुळेंचा आक्षेप; म्हणाल्या, "आम्हाला तुतारी मग..."

Supriya Sule On Ajit Pawar : ताई म्हणतात आता "आम्हाला तुतारी मग..." येत्या 25 सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. शरद पवार यांच्या या नव्या खेळीमुळे अजित पवार गटाचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये एक नवी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आगामी विधानसभा निवडणुका पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नवीन चिन्ह देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे.

यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती देखील वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी खंडपीठाकडे केली आहे. त्यांची ही मागणी मान्य झाली असून येत्या 25 सप्टेंबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. शरद पवार यांच्या या नव्या खेळीमुळे अजित पवार गटाचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे.

सुप्रिया सुळे पुणे दौरा वरती असताना या मागणीबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, कोर्टाकडे आम्ही याबाबत पहिल्यांदा मागणी केलेली नाही यापूर्वीही अशा प्रकारची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचा पक्ष असून ते त्याचे फाउंडर मेंबर आहेत. पक्षाच्या संविधानाप्रमाणे फाउंडर मेंबर आणि अध्यक्ष हे सर्व निर्णय घेतात. मात्र पक्षाचा संविधान बाजूला ठेवून एका अदृश्य शक्तीने पक्षाचे चिन्ह आणि पक्ष एका गटाला दिला आहे.

Supriya Sule
Supriya Sule : 'जय श्रीराम'च्या घोषणा अन् सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी उत्तर देऊ शकते, पण..."

त्यामुळे सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे त्यामुळे जोपर्यंत याबाबत ठोस असा निर्णय होत नाही तोपर्यंत ज्या पद्धतीने आम्हाला नवीन नाव आणि चिन्ह दिल आहे. त्याचप्रमाणे त्यांना देखील नवीन चिन्ह द्यावं अशी आमची मागणी आहे. घड्याळ चिन्ह याच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) अशी लोकांची धारणा आहे. त्यामुळे लोकांचा संभ्रम होत असून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे चिन्ह फ्रिज करावे अशी आमची मागणी असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Supriya Sule
Supriya Sule : 'जय श्रीराम'च्या घोषणा अन् सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मी उत्तर देऊ शकते, पण..."

सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुढे म्हणाल्या आमची एकच मागणी आहे की आमच्यावरती अन्याय होऊ नये. लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आलं होतं. मात्र त्या चिन्हाशी साधर्म्य असलेली पिपाणीच चिन्ह साताऱ्यात एका उमेदवाराला देण्यात आले त्यामुळे त्याचा फटका आमच्या उमेदवाराला बसला. अशा प्रकारे सातत्याने एक अदृश्य शक्ती आमच्यावरती अन्याय करत आहे. त्यामुळे आम्हाला न्यायची अपेक्षा आहे पुढील सुनावणी बुधवारी होणारा असून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय होईल अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com