Supriya Sule- Ajit Pawar Alliance : सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना युतीचा प्रस्ताव, शहराध्यक्ष योगेश बहलांचा गौप्यस्फोट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

PCMC Election Yogesh Behal : चंदगड नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. आता महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना युतीसाठी प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट योगेश बहल यांनी केला आहे.
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

NCP Politics : चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असताना पिंपरी-चिंचवडमध्ये देखील दोन्ही राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखीतमध्ये बहल यांनी सांगितले की, 'अजितदादांचे म्हणणं असं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून युतीसाठी प्रस्ताव आला आहे. सुप्रिया सुळेंकडून तसा निरोप आला आहे. त्यांचं म्हणणं होतं की याबाबतचे अंतिम बोलणं पवारसाहेबांसोबत व्हायचे आहे. मात्र, ते दोन पावले मागे जायला तयार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करू मात्र महायुतीसोबत कुठलेही गठबंधन करण्यास आम्ही तयार नाही.'

'अजित पवारांनी सांगितले आहे की अंतिम बोलणं व्हायचं आहे. परंतु तसा विचार सुरू आहे. अजितदादांनी याबाबत आमचं मत देखील विचारलं. आम्ही आपल्या मतांमध्ये फूट नको, असे म्हणत यासाठी सकारात्मकता दाखवली आहे.', असे देखील बहल यांनी सांगितले.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Pathri AMC News : बाबाजानी दुर्राणी यांचा पाथरीत अजित पवारांना धक्का; शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सभपतीवर अविश्वास!

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील पुण्यामध्ये बोलताना सांगितले की, अद्याप युती आणि आघाडीबाबत निर्णय झालेला नाही. काही कार्यकर्त्यांचं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढाव्या असं मत व्यक्त केल्याचे सांगितले. मात्र, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे घेणार आहेत असे देखील भरणे यांनी सांगितले.

चंदगडनंतर जेजुरीतही एकत्र?

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने चंदगड नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहे. त्यांनी विकास आघाडी स्थापन करून भाजपच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. चंदगडनंतर आता जेजुरीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत निवडणूक लढण्याची चर्चा सुरू आहे.

Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule
Delhi Car Blast update : दिल्ली स्फोटानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय; IPS विजय साखरे यांच्या ‘स्पेशल 10’ टीमवर महत्वाची जबाबदारी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com