Ajit Pawar : ...तसं तुम्ही करु नका; अजितदादांनी कार्यकर्त्यांना केले सावध...

Raigad tour : रायगड दौऱ्यात विविध विकासकामांचे भूमीपूजन. निवडणुका जिंकण्यासाठी दिला कानमंत्र.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Raigad News : आगामी निवडणुका जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. तर गाफील राहू नका आणि कुणी काही वक्तव्यं करतं तसं करू नका, असा सावधानतेचा इशारा दिला आहे. अजित पवार सध्या रायगड दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये विविध विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर अनेकांकडून काहीही वक्तव्य होताना दिसत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका. कुणी काही वक्तव्यं करतं तसं करू नका. जर असं कुणी वक्तव्य केलं तर त्याची नोंद देवेंद्र फडणवीस, रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे घेतात. आमची यावर व्यवस्थित चर्चा झालेली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या भावना दुखवून घेऊ नका, असा सावधानतेचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar
Talathi Recruitment News: नव्या तलाठी भाऊसाहेबांची क्रीम पोस्टिंगसाठी फिल्डींग

अजित पवार म्हणाले, आपले महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम करावे. आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठे दगडफेक, कुठे शिवीगाळ केल्याच्या घटना घडत आहेत. मात्र आपण असे करू नका. लोकसभेच्या 48 जागांसाठी तिन्ही पक्षांच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. ज्यांना जी जागा मिळेल त्याठिकाणी त्यांना निवडून आणण्यासाठी काम करायचे आहे. गेल्या वेळेपेक्षा जास्त मतांनी इथे आपली सीट निवडून आणायची आहे. आपण सर्व उमेदवार आहात, असा विचार करून काम करा. तुम्ही होम ग्राऊंड सांभाळा, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, आता मात्र विरोधक सैरावैरा होऊन पाळत आहेत. कमलनाथ देखील पक्ष सोडत असल्याची माहिती मला मिळाली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी अधिवेशन बोलावलं आहे. काही लोकांना झटपट निर्णय हवे मात्र याआधी चव्हाण, फडणवीस मुख्यमंत्री असताना आरक्षण कोर्टात मान्य झाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलेलं आहे. त्याच्या चौकटीत राहून काम करावे लागतं, असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar
Maratha Reservation : 'सगेसोयरे'ची अंमलबजावणी केली नाही तर...; जरांगे पाटलांचा सरकारला नवा अल्टीमेटम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com