Prashant Jagtap: सुप्रिया सुळेंनी प्रशांत जगतापांच्या 'नाराजीनाट्याचा विषय एका वाक्यातच संपवला; म्हणाल्या, 'लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, घरी...'

Supriya Sule : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी प्रशांत जगतापांच्या नाराजीला ठाम शब्दांत फटकारत पक्षशिस्त, संवाद आणि महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली.
Supriya Sule interacting with NCP workers in Pune while responding firmly to Prashant Jagtap’s dissent and outlining the party’s strategy for upcoming municipal elections.
Supriya Sule interacting with NCP workers in Pune while responding firmly to Prashant Jagtap’s dissent and outlining the party’s strategy for upcoming municipal elections.Sarkarnama
Published on
Updated on

Pune Election News : "लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, नाराजी घरी चालते', अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नाराजी नाट्याला धुडकावून लावले. शिवाय "महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला बरोबर घेऊन महापालिका निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न असेल.' असे सुळे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पक्ष कार्यालयास भेट देत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांची मते जाणून घेत महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. "अजित पवार यांच्याशी माझी भेट झालेली नाही, मात्र स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे. मी कोणालाही भेटायला तयार आहे. सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलूनच मी अजित पवार यांच्याशी बोलणार आहे. पूर्ण शंका निरसन होत नाही, तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. सर्व जबाबदारी माझी आहे' असल्याचे सुळे यांनी सांगितले.

प्रशांत जगताप यांच्या राजीनामानाट्याविषयी सुळे म्हणाल्या, "लोकशाहीमध्ये नाराजी चालत नाही, नाराजी घरी चालते. जगताप यांना मुंबईत मागील दोन दिवस चार ते सहा तास देऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी मांडलेले प्रश्‍न रास्त आहेत. र्चेतून मार्ग निघत असतो. पुण्याच्या हितासाठी चर्चा होत असेल तर, त्यामध्ये गैर काय ? सगळ्या कार्यकर्त्यांचे मत विचारत घेऊनच पक्ष निर्णय घेईल.'

Supriya Sule interacting with NCP workers in Pune while responding firmly to Prashant Jagtap’s dissent and outlining the party’s strategy for upcoming municipal elections.
Pune politics : पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! ब्राह्मण समाजानं वाढवलं भाजपसह इतर राजकीय पक्षांचं टेन्शन, नवा पर्याय निवडण्याच्या तयारीत

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं, अशी भूमिका समोर येताच प्रशांत जगताप यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. शरद पवार असो किंवा अजित पवार असो, यांच्यावर माझं प्रेम आहे आणि राहील. परंतु राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर माझ्यावर दबाव असूनही मी शरद पवारांची साथ सोडली नाही. पण ज्या दिवशी दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रित आघाडीची घोषणा होईल त्यावेळी मी राजीनामा देईन, असं प्रशांत जगताप यांनी यापूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर देखील दोन्ही पक्षांमध्ये आघाडीची बोलणी सुरूच राहिली.

Supriya Sule interacting with NCP workers in Pune while responding firmly to Prashant Jagtap’s dissent and outlining the party’s strategy for upcoming municipal elections.
Prashant Jagtap: प्रशांत जगताप यांनी अखेर शरद पवारांची साथ सोडली! कुठल्या पक्षात जाणार? स्पष्टच सांगितलं

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत एक समिती करण्यात आली होती. त्यामध्ये प्रशांत जगताप यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. समिती गठित झाल्यानंतर शहराध्यक्षपदी असून देखील विचारात न घेतल्याने जगताप यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता सुप्रिया सुळे यांनीच पुण्यात चांगला बदल हवा असेल, तर महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन महापालिका निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यादृष्टीने राष्ट्रवादी, दोन्ही ठाकरे, कॉंग्रेस यांच्यासमवेत आमची चर्चा सुरू आहे, असे सांगितल्याने प्रशांत जगताप काय निर्णय घेतात हे बघणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com