Mahayuti Politics : अजितदादांच्या बालेकिल्ल्यावर शिंदेसेनेचा डोळा; बड्या नेत्याचा शिवतारेंना सल्ला, ‘राजकारणात काहीही होऊ शकतं; शिवसेनेचे आमदार...’

Shivsena Political News : पुणे शहारातील कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुणे शहरातील ताकद वाढविल्यानंतर आता शिंदे सेनेने आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्याकडे वळविला आहे.
Ajit Pawar-Vijay Shivtare-Sharad Sonawane
Ajit Pawar-Vijay Shivtare-Sharad SonawaneSarkarnama
Published on
Updated on

Pune, 28 March : महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेषतः शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी आक्रमक पावले टाकली जात आहेत. त्यातून एकीकडे उद्वव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा कायम पुढे राहण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न होताना दिसत आहे.

दुसरीकडे अजितदादांनीही विस्तारवादी धोरण अवलंबिले आहे. मात्र, त्याच अजितदादांच्या बारामती लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने लक्ष्य केंद्रीत केले आहे, त्यातूनच बारामती विधानसभा मतदारसंघातील सहाही मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असावा, अशी अपेक्षा शरद सोनवणे यांनी मेळाव्यातून व्यक्त केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. पुणे शहारातील कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला धक्का देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुणे शहरातील ताकद वाढविल्यानंतर आता शिंदे सेनेने आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्याकडे वळविला आहे.

शिवसेनेने मिशन बारामती (Baramati) हाती घेतले आहे. त्याअंतर्गत शिवसेनेकडून संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांना सल्ला दिला आहे. कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी सोनवणे यांनी शिरूर लोकसभेसंदर्भातही मोठं भाष्य केले आहे.

Ajit Pawar-Vijay Shivtare-Sharad Sonawane
Anna Bansode : अजितदादांच्या कट्टर समर्थकाचं राष्ट्रवादीतील वजन वाढलं; विधानसभा उपाध्यक्षपदाबरोबरच दोन महत्वाचं पदंही सोपवली!

शिवसेनेच्या संवाद बैठकीत बोलताना आमदार शरद सोनवणे (Sharad Sonawane) म्हणाले, ‘बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात आपलेच (शिवसेनेचे) आमदार असायला हवेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सर्व येणाऱ्या सहाही मतदारसंघात विजय बापू शिवतारे यांनी आपले आमदार निवडणून आणले पाहिजेत, कारण राजकारणात काहीही होऊ शकतं.

'उद्या म्हणाले, तुमच्या ताकतीवर लढा’ तर आपली तयारी असायला हवी. आपली स्वतःची ताकद भरभक्कम हवी. शिवसेना पक्ष नेतृत्वाने आदेश दिला आणि उद्याची शिरूर लोकसभेची निवडणू जिंकायची आदेश दिले, तर शिरूर लोकसभेची ती जागा शंभर टक्के जिंकणारच. उतकंच नाही तर शिरूर लोकसभा मतदार संघातील सहाही आमदार निवडून आणणार, असा दावा शरद सोनवणे यांनी केला आहे.

Ajit Pawar-Vijay Shivtare-Sharad Sonawane
chandrakant patil : अजितदादांच्या शिलेदाराच्या भाजप प्रवेशाला चंद्रकांत पाटलांचा ‘ग्रीन सिग्नल’; संजयकाकांच्या घरवापसीचे संकेत

आमदार शरद सोनवणे आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीवर लक्ष केंद्रीत केल्याचे मानले जात आहे. त्याअनुषंगानेच आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली आहे, त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढायचा निर्णय झाला तर शिवसेनेडकून जोरदार तयारी केली जात आहे, हे आमदारांच्या विधानावरून स्पष्ट होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com