Sushma Andhare News : उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली..., व्हिडिओ ट्विट करत अंधारेंचा गंभीर आरोप

Sushma Andhare Criticize Devendra Fadnavis Over Pune Video : पोलिसांच्या एका व्हॅनचा व्हिडिओ शेअर करत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे...
sushma andhare
sushma andhareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आहे. पुण्यातील हा व्हिडिओ असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. न्यायालयातून येवरडा कारागृहात घेऊन जात असताना कैद्यांना पैसे वाटले, असा आरोप अंधारे यांनी केला आहे.

sushma andhare
ACB Action News : जनजागृती सप्ताह संपताच पुन्हा लाचखोरीला सुरुवात; एसीबीची धडक कारवाई!

पोलिसांची व्हॅन थांबवली त्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही नाही. त्या व्हिडिओत पोलिस व्हॅनचा नंबरही दिसतो. ही व्हॅन पिंपरी-चिंचवड पासिंगची आहे. या वाहनाचा चालक कोण होता? अधिकाऱ्याचा चेहरा स्पष्ट दिसतोय. तो अधिकारी कोण आहे ते तपासा. गृहमंत्री म्हणून तुम्ही अपयशी आहात, नापास आहात. तुम्ही फक्त पक्ष फोडत राहा आणि मराठा विरुद्ध ओबीसी असे वाद लावत राहा. कारण तुम्हाला गृहखातं सांभाळता येत नाही, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सुषमा अंधारेंनी ट्विटमध्ये काय म्हटलंय?

उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगूज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड, असं म्हणत अंधारे यांनी ट्विटमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे.

sushma andhare
NIA-Pune Police : सीरियातून सूचना; पण पुणे पोलिसांनी उधळला साखळी बॉम्बस्फोटाचा कट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com