Pune News : लाचखोरी आटोक्यात यावी, त्याला आळा बसावा, यासाठी संबंधित प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना केल्या जातात. मात्र ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंतच्या दक्षता जनजागृती सप्ताहातही लाचखोरीचे पाच ट्रॅप नाशिक रेंज एसीबी युनीटने करीत आपला दबदबा आणि पहिला नंबर राज्यात यावर्षी कायम ठेवला. तर, या सप्ताहात असा एक ट्रॅप केलेले एसीबीचे पुणे युनिट हा आठवडा संपताच पुन्हा ॲक्टिव्ह मोडवर आले आहे. त्यांनी एका तरुण शेतकऱ्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना सोनोरी (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील तलाठी निलेश सुभाष गद्रे (वय ४२) याला पकडले. (Latest Marathi News)
आदित्य मधुकर कुंभारकर (वय २१, रा. वजपुरी, ता.पुरंदर) या आपल्या खबरीमार्फत गद्रेने ही लाच दिवे गाव येथे घेतली होती. त्यामुळे एसीबीने कुंभारकरलाही अटक केली. तक्रारदार शेतकऱ्याला त्याच्या आजोबांनी ३९ गुंठे म्हणजे जवळजवळ एक एकर जमीन बक्षीसपात्र दिली होती. त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी त्यांनी सोनोरी तलाठी कार्यालयात अर्ज केला.
त्यावेळी तेथील तलाठी गद्रेने त्यांच्याकडे पाच हजार रुपये लाच मागितली.ती कुंभारकरने स्वीकारली. त्यामुळे या दोघांनाही पकडण्यात आले.ज्या दिवशी तक्रार आली,त्याच दिवशी तिची पडताळणी करीत एसीबीने ही तत्पर कारवाई केली हे विशेष.याबाबत सासवड पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा पुढील तपास एसीबीचे पीआय प्रवीण निंबाळकर हे करीत आहेत.
हा दक्षता सप्ताह सुरु असतानाच पुणे रेंजच्या एसीबी युनिटने कोल्हापूर महापालिकेतील दोन क्लार्क तथा मुकादम शेखर अरुण पाटील (वय. २६) आणि रोहित विनायक जाधव (वय ३२,दोघेही राजारामपुरी कार्यालय) यांना साडेतीन हजार रुपये लाच घेताना तीन तारखेला पकडले. तक्रारदारांनी खरेदी केलेल्या घराची नोंद महापालिकेत करण्यासाठी वरील दोघांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली. नंतर साडेतीन हजारावर तडजोड केली होती.त्याबद्दल या जोडगोळीविरुद्ध राजारामपुरी पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.