Dattatray Gade Latest News : दत्तात्रय गाडेच्या गावात 1 लाखाच्या बक्षिसावरून दोन गट! गावकऱ्यांनी पोलिसांसमोर ठेवली अट

Gunat Village Pune Police Swargate Rape Case : पुणे पोलिसांनी आरोपीला पकडून देण्यासाठी एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. आरोपीला अटक करताना गुनाट गावातील अनेक नागरिकांची पोलिसांना मदत झाली.
Dattatray Gade arrest
Dattatray Gade arrestSarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्वारगेट एसटी बसस्थानकातील बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी दत्तात्रय गाडे त्याच्या गुनाट या गावी लपला होता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाला होता. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्याला अटकही केली. पण आता त्याला पकडून देण्यासाठी पोलिसांनी जाहीर केलेले एक लाखांच्या बक्षिसावरून गावकऱ्यांमध्ये एकमत नसल्याचे समोर आले आहे.

पुणे पोलिसांनी आरोपीला पकडून देण्यासाठी एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. आरोपीला अटक करताना गुनाट गावातील अनेक नागरिकांची पोलिसांना मदत झाली. आरोपी कुठे लपला आहे याची माहिती देण्यापासून पोलिसांबरोबर शोध कार्यात मदत गावकऱ्यांनी केली. त्यामुळे पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेलं एक लाखाचं बक्षीस नेमकं कोणाला देण्यात येणार याबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या.

Dattatray Gade arrest
Supriya Sule News : सुप्रिया सुळेंकडून बेमुदत उपोषणाची घोषणा; एका रस्त्याच्या कामासाठी मोठा निर्णय...

अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गुनाट गावातील काही नागरिकांनी आम्हाला बक्षीस नको, अशी भूमिका घेतली आहे तर काही ग्रामस्थांनी बक्षीस स्वीकारण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. दत्तात्रेय गाडेला  पकडल्यानंतर एक लाखाचं बक्षीस गावातील नागरिकांना देण्यात येणार असल्याचं पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आता गुनाट गावातील ग्रामस्थांनी बक्षीसाची ही रक्कम घ्यायची नाही, असं ठरवलं आहे.

या प्रकरणांमध्ये गावाची बदनामी झालेली आहे, असं काही ग्रामस्थांचं मत आहे. ज्या प्रकरणात गावाची बदनामी झाली त्या प्रकरणातून बक्षीस नकोच, असं काही ग्रामस्थांचा मत आहे. मात्र गावांमध्ये दुसरा देखील एक मतप्रवाह असल्याचे पाहायला मिळत आहे. काही गावकऱ्यांचं म्हणणं आहे ही बक्षिसाची रक्कम कोणा एका व्यक्तीला न देता ती गावाला द्यावी आणि ती रक्कम गावाच्या विकासासाठी वापरावी, अशी अट ग्रामस्थांनी घातली आहे.

Dattatray Gade arrest
Swargate Rape Case: स्वारगेट प्रकरणाला वेगळे वळण देणाऱ्या वकिलांची पोलिसांकडे धाव; म्हणाले, 'आम्हाला प्रोटेक्शन हवंय..'

त्यामुळे आता गुनाट गावातील ग्रामस्थांचं पोलिस ऐकणार का? एक लाखाच्या बक्षीसाबाबत नेमका काय निर्णय घेणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार स्वत: गावात जाणार असून बक्षिसाची रक्कम देणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले आहे. गावातील नागरिकांचाही ते सत्कार करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com