Swargate Rape Case: स्वारगेट प्रकरणाला वेगळे वळण देणाऱ्या वकिलांची पोलिसांकडे धाव; म्हणाले, 'आम्हाला प्रोटेक्शन हवंय..'

Lawyers Seek Protection News : आरोपीने गुन्हा केला आहे की नाही ते कोर्ट ठरवेल. मात्र, आरोपीची केस घेतल्यापासून आम्हाला सोशल मीडियावरील ट्रोल केले जात आहे. त्यासोबतच धमक्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे आम्हाला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे.
Swargate Rape case
Swargate Rape caseSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणांमध्ये आरोपीची बाजू वकील म्हणून वाजिद खान बिडकर आणि साजिद शहा हे मांडत आहेत. या दोन्ही वकिलांना सध्या सोशल मीडियावरील ट्रोलिंगला समोर जावे लागत आहे. तसेच धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे या वकिलांनी पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचे वकील वाजीद खान बिडकर, साजिद शहा, आणि गाडेचे बंधू यांनी सोमवारी पुणे पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना वाजीद खान बिडकर म्हणाले, 'आरोपीने गुन्हा केला आहे की नाही ते कोर्ट ठरवेल. मात्र, आरोपीची केस घेतल्यापासून आम्हाला सोशल मीडियावरील ट्रोल केले जात आहे. त्यासोबतच धमक्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे आम्हाला पोलीस (Police) प्रोटेक्शनची गरज आहे.

Swargate Rape case
Shivsena News : उद्धव ठाकरेंचा सातबारा कोरा होणार; आशिष जयस्वालांचा राऊतांना टोला

सोशल मीडियावर ज्या पद्धतीच्या कमेंट आणि धमक्या येत आहेत. त्या अत्यंत चुकीच्या आहेत. कायदेशीर बाजू मांडण्याचा वकील म्हणून आम्हाला अधिकार आहे. जर त्याने काही चुकीचं केलं असेल तर ते कोर्टाच्या समोर येणारच आहे. मात्र, आम्हाला ज्या पद्धतीने धमकवण्यात येत आहे. त्यासोबतच अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी आम्ही पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Swargate Rape case
Tanaji Sawant : वादग्रस्त विधानं, हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे गंभीर आरोप अन् बरंच काही..! तानाजी सावंतांच्या पाठीमागचं 'शुक्लकाष्ठ' संपेचना...

केस घेतल्यापासून आमच्यावर सतत दबाव असून चार लोक आम्हाला उठून मारतील का ? असे वाटत आहे. या दबावाच्या वातावरणात केस लढणे अवघड जात आहे. जर आपल्या देशामध्ये कसाब सारख्या आतंकवाद्याला वकील मिळत असेल तर गाडेला का मिळू नये ? असा सवाल वाजिद खान बिडकर यांनी उपस्थित केला.

Swargate Rape case
Shivsena UBT : विरोधी पक्षनेतेपदी 'भास्कर जाधव फिक्स? ढासळलेला बालेकिल्ला काबीज करण्यासाठी 'ठाकरेंची' खेळी

जेव्हापासून या आरोपीची केस घेतली आहे. तेव्हापासून येत असलेल्या धमकीचे फोन आणि सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे माझी बायको देखील माझ्यासोबत कधी भाजी घेण्यासाठी येत नाही. ही देखील माझ्यासोबत यायला घाबरत असल्याचं खान बिडकर यांनी सांगितले.

Swargate Rape case
Ajit Pawar : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन किती दिवस चालणार ? अजितदादांनी स्पष्टच सांगितले

खान बिडकर पुढे म्हणाले, या सगळ्यात पैशाचा व्यवहार झाला, याबाबतचं विधान आम्ही कुठेही केलेले नाही. या संबंधांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचं स्टेटमेंट आम्ही कोर्टापुढे देखील केले नसल्याचं स्पष्टीकरण यावेळी खान बिडकर यांनी दिले.

Swargate Rape case
Devendra fadnavis : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं वक्तव्य, म्हणाले, अण्णा हजारेंचा आदर पण...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com