Giriraj Sawant : भाजपकडून उमेदवारी नको? तानाजी सावंतांच्या पुत्राने दंड थोपटले, मनातंल सगळं सांगून टाकलं

Pune Municipal Elections Tanaji Sawant Son Giriraj Sawant : तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत यांनी भाजपकडून आपण उमेदवारी फाॅर्म घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
Giriraj Sawant
Giriraj Sawant sarkarnama
Published on
Updated on

Giriraj Sawant News : माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे पुत्र गिरीराज सावंत हे पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.ते भाजपचा उमेदवारी अर्ज घेऊन गेल्याची चर्चा होती. मात्र, भाजपचा उमेदवारी अर्ज आपण नेला नसल्याचे त्यांनी सांगितले. महायुती म्हणून आपण निवडणुकीला समारे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले.

गिरीराज सावंत यांनी स्पष्ट केले की, तानाजी सावंत हे शिवसेनेचे मंत्री होते, आमदार आहेत. त्यामुळे महायुती म्हणून आपण निवडणुकीला समोरे जाण्यास तयार आहोत. गेली पाच वर्ष पुण्याच्या दक्षिण भागात प्रतिष्ठाणच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहोत. आता सामाजिक कार्यातून राजकीय कार्याकडे वळणार आहोत.

महायुती म्हणून लढण्याचा विचार आहे. संधी दिली तर लढण्याचा विचार नक्कीच करू, असे सांगत भाजप-शिवसेनेची युती झाली तर शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात आपण असू असे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. इतर कुठल्याही पक्षाकडून लढण्यापेक्षा आपण महायुती म्हणून लढू असे ते वारंवार सांगत होते.

मी कुठून लढण्यास इच्छूक आहेत यापेक्षा जनता तुम्हाला कुठे पाहण्यास आवडते त्यावर ठरेल, जनमत ठरवेल तसं आपण करू, असे देखील त्यांनी सांगितले.

Giriraj Sawant
Tejasvee Ghosalkar: वेदनेतून घेतला निर्णय! ठाकरेंच्या निष्ठावंत माजी आमदाराच्या सुनेचा भाजपप्रवेश; फेसबूक पोस्ट शेअर

भाजपचा फाॅर्म घेतला नाही

गिरीराज सावंत यांच्या संस्थेची गाडी भाजप कार्यालयाबाहेर दिसली होती. त्यामुळे त्यांनी भाजपचा उमेदवारी फाॅर्म घेतल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या संस्थेत अनेक कर्मचारी आहेत. त्यांच्या गाडीवर देखील संस्थेचा लोगो आहे. ती गाडी तेथे दिसली असेल. जर फाॅर्म घ्यायचा असता तर आपण स्वतः गेलो असतो कर्मचाऱ्यांना पाठवले नसते, असे देखील त्यांनी सांगितले.तसेच भाजपचा उमेदवारी फाॅर्म घेतला नसल्याचे स्पष्ट केले.

...तर नक्की निवडणूक लढणार

गिरीराज सावंत यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतला नसल्याचे स्पष्ट करताना निवडणूक लढण्यावर देखील स्पष्ट भाष्य केले. ते म्हणाले, महायुतीमध्ये संधी मिळाली तर नक्की लढू. युती होणार की नाही याच्या चर्चा सुरू असताना युती होणार की नाही हे वरिष्ठ नेते ठरवतील. मात्र, महायुती म्हणून एकत्र असू तर आपण नक्की लढू असे देखील त्यांनी सांगितले.

Giriraj Sawant
Shani Shingnapur fake app : शनैश्वर देवस्थान अ‍ॅप घोटाळाप्रकरण; जगभरातील भाविकांना गंडा, शिंदेचा शिलेदार म्हणतो, CBI तपास करा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com