
Tanaji Sawant News : शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या मुलगा ऋषिराज याचे अपहरण झाल्याची तक्रार सिंहगड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. चौकशीमध्ये सावंत यांचा मुलगा खासगी विमानाने बँकाॅकला जात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस आणि विमान वाहतूक मंत्रालयाने मध्यस्थी करत बँकाॅकला जाणारे विमान परत बोलावले. त्यानंतर स्पष्ट झाले की ऋषिराज मित्रांसोबत मिटिंगसाठी बँकाॅकला जात होता.
ऋषिराज याने घरी कोणालाच कल्पना न देता गेल्याने त्याच्या अपहरणाची तक्रार देण्यात आली होती. मात्र, आता पोलिसांनी या प्रकराणात न्यायलाया बी फायनल रिपोर्ट सादर करत अपहरणाची फाईल बंद केली असल्याची माहिती समोर आली आहे.
10 फेब्रुवारीला माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती की त्यांच्या मुलाचे अपहरण झाले आहे. मुलाची गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरने मुलाला पुणे विमानतळावर सोडल्याचे सांगितले तसेच ऋषिराज यांच्यासोबत त्यांचे मित्र असल्याचे सांगितले. त्यामुळे मित्रांनीच ऋषिराज यांनी अपहरण केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आमदाराच्या मुलाचे अपहरण झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
पोलिसानी तातडीने विमान वाहतूक मंत्रालयाशी संपर्क साधत देशाच्या सीमेबाहेर जाण्याआधीच ऋषिराज यांचे चार्टड विमान परत पुणे विमानतळावर बोलावले. ऋषिराज हे पुन्हा पुण्यात आले तेव्हा कळले की त्यांचे अपहरण झाले नव्हते. खासगी कामानिमित्त ते देशाबाहेर चालले होते. मात्र,आमदाराच्या मुलाच्या शोधासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर केल्याची टीका सोशल मीडियावर करण्यात येत होती.
अपहरण नाट्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत झालेल्या गैरसमजाची माहिती दिली. आमदार तानाजी सावंत यांनी देखील गैरसमजातून ही तक्रार देण्यात आल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणाच्या पाच महिन्यानंतर पोलिसांनी तपासाची फाईल बंद करत कोर्टात बी फायनल रिपोर्ट सादर केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.