ED Arrested Anilkumar Pawar : एकनाथ शिंदेंचा मंत्री अडचणीत? जवळच्या अधिकाऱ्याला ईडीकडून अटक; निवृत्तीच्या एका महिन्याच्या आतच कारवाई!

ED Eknath Shinde Dada Bhuse : अनिलकुमार पवार यांची वसई-विरारच्या आयुक्तपदी नियुक्ती ही मंत्री दादा भुसे यांच्या शिफारशीवरून करण्यात आली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.
Dada Bhuse & Eknath shinde
Dada Bhuse & Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Anilkumar Pawar News: वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त, सेवानिवृत्त IAS अधिकारी अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक करण्यात आले आहे. पवार यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. अनिलकुमार हे मंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अधिकारी असल्याचे दावा काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी केला होता. अनिलकुमार पवार हे जुलै महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत.

महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी अनिलकुमार पवार यांची नियुक्ती ही दादा भुसे यांच्या शिफारशीवरून केली होती असे देखील राऊत यांनी म्हटले होते. दरम्यान, अनिलकुमार हे वसई-विरारचे आयुक्त असताना त्यांनी मलनिस्सारण आणि डम्पिंग ग्राऊंडसाठी राखीव असलेल्या 60 एकर जमिनीवर बांधकाम करण्यास परवानगी दिली. तसेत 41 अनधिकृत इमरती उभारल्या यामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला आहे.

मंगळवारी ईडीकडून अनिलकुमार यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर अनिलकुमार यांच्या देखील स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर बुधवारी त्यांना अटक करण्यात आले. दरम्यान, ईडीकडून बांधकाम प्रकरणातील मुख्य सुत्रधार सीताराम गुप्त, अरुण गुप्ता आणि नगर रचनाकार वाय एस रेड्डी यांना देखील अटक केली.

Dada Bhuse & Eknath shinde
Chhagan Bhujbal : महायुतीमध्ये तणाव, छगन भुजबळांचा गोंदियाला जाण्यास स्पष्ट नकार!

कोट्यावधींची संपत्ती जमवली

अनिलकुमार पवार यांनी अनधिकृत बांधकांना परवानगी देऊन कोट्यावधी रुपये जमवले. बांधकामात प्रति चौरस फूट 20 ते 25 रुपये दराने पवार यांनी लाच स्वीकारल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस ईडीने अनिलकुमार यांच्या घरावर छापा मारून कोट्यावधी रुपये तसेच महत्त्वाची संपत्ती जप्त केली होती.

Dada Bhuse & Eknath shinde
'शिवरायांचे आरमार पेशव्यांनी बुडवले?', साने गुरुजींचा व्हिडिओ स्टेटसला ठेवत भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com