Sanjay Raut On Devendra Fadnavis : फडणवीसांची लेवल मोठी, गोरगरिबांची कामे ते कसे करतील? संजय राऊत यांची टीका

Tanisha Bhise Death News : 'त्या' महिलेसाठी रुग्णालयाला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून फोन गेले. तरही त्या भिसे कुटुंबावर ही आफत आली कशी सवाल राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut - Devendra Fadnavis
Sanjay Raut - Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. 10 लाख डिपॉझिटची मागणी करत गर्भवती पत्नीला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. धक्कादाक म्हणजे मृत महिला तनिषा भिसे या भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. या प्रकरणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

खासदार संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकारावरुन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरत त्यांच्यावर जहरी टीका केली आहे. ते म्हणाले, त्या महिलेसाठी रुग्णालयाला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून फोन गेले असं सांगितलं जात आहे. तरही त्या भिसे कुटुंबावर हे संकट आलं. एका मातेचा करुन अंत झाला. काय करताय देवेंद्र फडणवीस? सरकारला शंभर दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसलेले आहेत अशी टीका राऊतांनी केली.

Sanjay Raut - Devendra Fadnavis
Manikrao Kokate : कृषीमंत्री नाशिकचेच, ते पुसतील का शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू?

राऊत म्हणाले, मला असं वाटतं की ही जी गोरगरिबांची कामे आहेत ती देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलची नाही. त्यांची लेवल खूप मोठी आहे. गोरगरिब मध्यमवर्गीय, शेतकरी तडफडून मरत आहेत. सरकारी योजना फक्त कागदावर आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार हे तोंडाला पोपट बांधून फिरत आहेत. पोपटपंची करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत बोलायचं झालं तर त्यांची झेप खूप मोठी आहे. अडाणी, अंबानी, डाटा-र्बिला मोठमोठे ठेकेदार त्यांची कामं होत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या लेवलची कामे सांगितली पाहिजे. गोरगरिबांची कामे फडणवीस कसे करतील असा सवाल संजय राऊत यांनी केला.

भाजपचे कार्यकर्ते, त्यांची बायका मुलं तडफडून मरत आहेत. आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले आहेत. हे सहन करणार नाही ते सहन करणार नाही असं नुसतं मंत्रालयात बसून दम देणं सोप्प असतं. आख्य्या महाराष्ट्रात अराजकता माजली असताना हे मोदींचे भजन करत बसले आहेत. रोज नव्या घोषणा करत आहेत. आता मागच्या पुढच्या शंभर दिवसांचा वेध घेणार आहेत म्हणे असा संताप संजय राऊतांनी व्यक्त केला.

राऊत म्हणाले, तुमच्या समोर एक माता मरते आणि तुम्ही काहीच करु शकला नाही. अहो, वीस लाख रुपये उपचारासाठी या महाराष्ट्रातील सामन्य माणूस कसा देऊ शकतो? शेत विकून त्यांनी द्यायची तयारी दाखवली. माझ्याकडे सगळी माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडावर सगळी माहिती फेकू शकतो. आम्ही बोललो की त्यांना वरुन-खालून मिर्च्या झोंबतात. पण जरा तुमची लेवल खाली आणा एवढीवर सुद्धा नेऊ नका. गौतम अडाणी, अंबानी यांचा हा महाराष्ट्र नाही, काल ज्या माता तडफडून मेल्या त्यांच्या सारख्यांचा हा महाराष्ट असल्याचं राऊतांनी सुनावलं.

Sanjay Raut - Devendra Fadnavis
Nandurbar Guardian Minister : नंदुरबारचे पालकमंत्री खरच हरवले? दोन महिने उलटले तरी फिरकले नाही

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com