Teacher Recruitment : शिक्षक भरतीत मोठा ट्विस्ट! नियुक्तीआधी होणार ‘त्या’ उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, शिक्षण आयुक्तांचे कडक निर्देश

Character Verification Eligible Candidates : शिक्षक म्गून १३ हजार २०७ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांसाठी चारित्र्य पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.
Education Commissioner issues strict directions for character verification of eligible candidates in teacher recruitment.
Education Commissioner issues strict directions for character verification of eligible candidates in teacher recruitment.AI Created Image
Published on
Updated on

Pune News : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत आता उमेदवारांच्या चारित्र्याचीही कसून पडताळणी केली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीची प्रक्रिया जाहीर केली असून, नियुक्तीपूर्वी उमेदवारांच्या कागदपत्रांसह चारित्र्य पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २ ते ५ सप्टेंबरदरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान समुपदेशनाच्या माध्यमातून उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. मात्र, नियुक्तीपूर्वी संबंधित उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे.

जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, शासकीय विद्यानिकेतन तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये पवित्र संकेतस्थळाद्वारे सुमारे १३ हजार २०७ उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

यामध्ये पाचवीच्या वर्गासाठी ७ हजार ५४९, सहावी ते आठवीसाठी ४ हजार २०७, नववी ते दहावीसाठी १ हजार १९९ आणि अकरावी ते बारावीच्या वर्गासाठी २५२ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

...तर नियुक्ती नाही

शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी राज्यातील महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, खासगी शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष व सचिवांना याबाबत सूचना दिल्या आहेत.स्व-प्रमाणपत्रातील माहिती आणि सादर केलेली कागदपत्रे तसेच मूळ प्रमाणपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास उमेदवाराला नियुक्ती दिली जाणार नाही.

Education Commissioner issues strict directions for character verification of eligible candidates in teacher recruitment.
Teacher Recruitment 2026: 30 हजार 209 शिक्षक पदांची मेगाभरती सुरू! 19,881 जणांना मुलाखतीशिवाय नोकरी; कुठे किती पदे?

हमीपत्राशिवाय नियुक्ती नाही

टीईटी परीक्षेतील गैरप्रकारामुळे चारित्र्य पडताळणीशिवाय किंवा हमीपत्राशिवाय नियुक्ती देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय नियुक्तीपूर्वी उमेदवार चारित्र्यदृष्ट्या पात्र आहे की नाही, याची तपासणी सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या अंतिम टप्प्यात कागदपत्र पडताळणीसोबतच चारित्र्य पडताळणीचीही मोठी जबाबदारी संबंधित यंत्रणांवर आली आहे.

Education Commissioner issues strict directions for character verification of eligible candidates in teacher recruitment.
Teacher Recruitment : ​शिक्षक भरतीत महिलांना मोठी संधी; तब्बल 13 हजार पदांची शिफारस यादी जाहीर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com