Sushma Andhare: महिला आयोग? छे, छे आयोग तर फक्त कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये वावरतो; अंधारेंनी चाकणकरांना डिवचलं

Sushma Andhare ON Rupali Chakankar: अध्यक्षपदावर रूपाली चाकणकर या कायम राहतील मात्र त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आयोगात जास्तीत जास्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
Sushma Andhare ON Rupali Chakankar news
Sushma Andhare ON Rupali Chakankar newsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महिला आयोगाच्या अशासकीय सदस्यांची मुदत जानेवारीमध्ये संपली आहे. सध्या महिला आयोगाचा कारभार हा अशासकीय सदस्य विना सुरू आहे. लवकरच या राजकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र या नियुक्तीवरून महायुतीतील मित्र पक्षांमध्ये संघर्ष होण्याचे चित्र आहे. यावरूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोग आणि आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर अनेक महायुतीचे कार्यकर्ते आपली महिला आयोगाच्या सदस्यपदी वर्णी लागेल अशी आस लावून आहेत. महिला आयोगाची सदस्यपद मिळवण्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी यादी आहे.

महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना यापूर्वी तीन वर्षासाठीची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्षपदावर रूपाली चाकणकर या कायम राहतील मात्र त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आयोगात जास्तीत जास्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेने कडून देखील या सदस्य पदांसाठी लॉबिंग सुरू असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे आता नव्या कार्यकारणीत समावेशासाठी महायुतीतील पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

Sushma Andhare ON Rupali Chakankar news
Kash Patel: FBIच्या संचालकपदी नियुक्तीनंतर काश पटेल यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी

महिला आयोगामध्ये अध्यक्षांसह, 6 अशासकीय सदस्य, 1 सदस्य सचिव आणि राज्याचे पोलिस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य म्हणून काम पाहत असतात. त्याच वेळी आयोगासाठी सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांची पदेही मंजूर केली जातात. सध्या या सहा अशासकीय पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. त्यावरूनच ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, "गेल्या पाच वर्षात ज्या महिला आयोगाचे अस्तित्व तीळ मात्र ही जाणवलं नाही. जो महिला आयोग फक्त आणि फक्त कार्पोरेट पार्ट्यांमधून वावरताना दिसला.. त्याच्यावरून म्हणे महायुतीत ठिणगी पडतेय... मायाहो.. दादाहो.. महिला आयोग तिघांपैकी कुणाच्याही वाट्याला गेला तरी त्या पदावर बसणारी व्यक्ती बुद्धी, कायद्याचे ज्ञान, जनमानसात जाऊन काम करण्याची तयारी या निकषावर थोडीच बसते? हे असले आयोग म्हणजे असून अडचण नसून खोळंबा आहे. तो कुणाच्या वाट्याला जाईल यावर वादावादी करण्यापेक्षा सरळ आयोग बरखास्त करून टाका,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com