Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हेंचा धक्कादायक खुलासा; म्हणाल्या, आदित्य ठाकरेंच्या आजच्या सभेतही हल्ला...''

Shivsanwad Yatra : अंधारात भ्याड हल्ले करणे बंद करा...
Neelam Gorhe
Neelam Gorhe Sarkarnama
Published on
Updated on

Neelam Gorhe On Aaditya Thackeray Shivsanwad Yatra : ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे शिवसंवाद यात्रेदरम्यान हल्ला करण्यात आला होता. यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचवरुन आदित्य ठाकरेंनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता याचदरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नीलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवरील हल्ला प्रकरणावर भाष्य केलं आहे. गोऱ्हे म्हणाल्या,आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) आजच्या सभेतदेखील हल्ला होण्याची शक्यता आहे. तसे इनपुट्स आमच्याकडे आले आहेत. मागच्या वेळी औरंगाबादमध्ये स्थानिक पोलिसांनी दुर्लक्ष केलं, मात्र, आजही तशीच शक्यता असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त द्यावा यासंबंधीची मागणी गृहखात्याकडे केल्याचंही गोऱ्हे म्हणाल्या.

आदित्य ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सूरू आहे. त्यांच्या दौऱ्यात दगडफेकीसारखा प्रकार घडला. आजही पोलिसांना तशी माहिती होती. आता मी यात लक्ष घातलं असून पोलिसांशी माझं बोलणं झालं आहे. सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांचं लक्ष सगळीकडे पाहिजे. पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त दिलेला नाही. धमक्यांच्या संदर्भात काहीच पाऊल उचललं नाही. यात्रेदरम्यान पोलिसांकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं गेलं नाही, हा अक्षम्य प्रकार असल्याची टीका करतानाच अंधारात भ्याड हल्ले करणे बंद करा, असा इशाराही नीलम गोऱ्हे(Neelam Gorhe) यांंनी दिला आहे.

Neelam Gorhe
Ajit Pawar News: प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यानंतर अजित पवार संतापले; शिंदे,फडणवीसांना म्हणाले...

आमदारांना स्वतःचं रक्षण स्वत: च करावं लागतंय..

काँग्रेस(Congress)च्या कळमनुरी मतदारसंघाच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्लाप्रकरणी भाष्य करताना गोऱ्हे म्हणाल्या. सातव यांच्यावरील हल्ला भयंकर असून हा हल्ला पूर्वनियोजित होता. यामागे राजकीय नेत्यांचा हात असण्याची शक्यता आहे. मात्र, आमदारांना स्वत:चं संरक्षण स्वत:ला करावं लागतंय ही बाब चिंताजनक आहे. मी याबाबत गृह सचिवांशी बोलले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील बोलणार आहे. असं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलंय.

Neelam Gorhe
Narendra Modi : "किचड उनके पास था, मेरे पास.." ; टीका करताना मोदींचा शायराना अंदाज!

आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ...

ठाकरे गटाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान औरंगाबादमध्ये येथे त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर विधान परिषदेचे पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा हल्ला शिंदे गटातील आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा गंभीर आऱोप केला होता.

आता यानंतर आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेदरम्यान स्थानिक पोलिसांचा अतिरिक्त ताफा सुरक्षेसाठी तैनात राहील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com