Congress vs NCP, Shivsena : राज्यातील १४७ कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान झाले. यात पुणे जिल्ह्यातील आठ बाजार समितींचा समावेश होता. दरम्यान, भोर बाजार समितीसाठी तब्बल ९८.२० टक्के शांततेत मतदान पार पडले. आता येथील मतमोजणी सुरू झाली असून रात्री नऊ वाजेपर्यंत निकाल येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. टी. घुगे यांनी दिली.
भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bhor APMC) पंचवार्षीक निवडणुकीसाठी शांततेत मतदान झाले. सकाळी ९ वाजता सुरु झालेले मतदान सायंकाळी ४ वाजता पूर्ण झाले. तालुक्यातील दोन हजार ३ मतदारांपैकी एक हजार ९६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भोर शहरातील नगरपालिका शाळा क्रमांक २, आंबेघर येथील प्राथमिक शाळा, किकवी येथील शिवाजी विद्यालय आणि नसरापूर येथील प्राथमिक शाळा या चार मतदान केंद्रांवर मतदान पार पडले.
या बाजार समितीसाठी तब्बल ९८.२० टक्के मतदान झाले. किकवी मतदान केंद्रावर सर्वाधिक ९९.४४ टक्के, त्यानंतर भोर शहरातील केंद्रावर ९९.१० टक्के, नसरापूर येथे ९९.०२ टक्के तर सर्वांत कमी आंबेघर येथे ९५.६२ टक्के मतदान झाले. दरम्यान, मतदान सुरू असताना सकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सकाळी १० नंतर मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी झाली होती.
भोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी आज मतदान झाले. दरम्यान, या बाजार समितीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी काँग्रेस नेते आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), भाजप, शिवसेना (शिंदे गट आणि ठाकरे गट) यांनी एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. आता या बाजार समितीवर काँग्रेस सत्ता राखणार की इतर सर्व पक्ष पुरस्कृत पॅनल सत्ता स्थापन करणार, याकडे तालुक्यासह पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
रात्री नऊपर्यंत निकाल लागणार
आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून सायंकाळी सहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. सर्व मतपत्रीका या भोर शहरातील प्राथमिक शिक्षक सहकार भवनामध्ये आणल्या आहेत. मतमोजणीसाठी आठ टेबल ठेवले आहेत. त्यामुळे रात्री ९ वाजेपर्यंत भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.