Ajit Pawar News : 'बारसू'वरून ठाकरे गटातील मतभेद अजित पवारांनी आणले समोर; म्हणाले..

Ajit Pawar News : "उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे खासदार वगैरे या प्रकल्पाला विरोध करत आहेत."
Ajit Pawar News :
Ajit Pawar News :Sarkarnama

Ajit Pawar On Barsu Refinery : रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या माती परीक्षणाला शुक्रवारी (ता. २८) स्थानिकांनी प्रचंड विरोध केला. पोलिसांनी मात्र त्यांना माती परीक्षण सुरु असलेल्या ठिकाणी जाण्यापासून रोखले. यामुळे आंदोलन अधिक तीव्र झाले होते.

या प्रकल्पासंदर्भात आता विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील या प्रकल्पावरून पडलेले मतभेद पवारांनी बोलून दाखवत, अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर अप्रत्यक्ष आरसा दाखवला आहे.

Ajit Pawar News :
Ramdas Athwale on CM Post: भाजपमध्ये आल्यास अजित पवार मुख्यमंत्री होणार? केंद्रीय नेत्याचं मोठ विधान...

अजित पवार म्हणाले, "काही जण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे खासदार वगैरे या प्रकल्पाला विरोध करत आहेत. परत त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचं वक्तव्य मी स्वत: पाहिलंय. आमदार साळवी हे बारसूच्या भागाचं प्रतिनिधित्व आज विधानसेभेत करत आहेत. ठाकरे गटात असलेल्या आमदारांपैकी एक राजन साळवी हे ही आहेत. त्यांचा मात्र म्हणणं आहे की, या प्रकल्पाला आमचा पाठिंबा आहे. चार - पाच लाख लोकांचा प्रतिनिधित्व करणारे आमदार म्हणत आहेत माझा पाठिंबा आहे. माझी भूमिका अशी आहे की. यातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल, तर स्थानिकांना विश्वासात घेऊन,संदेनशीलता सरकारने दाखवावी. समज गैरसमज दूर करावेत, अशी माझी भूमिका आहे."

अजित पवार म्हणाले, "बारसू येथील प्रकल्पाला नेमका विरोध कशासाठी हे पाहिलं पाहिजे पाहिजे. तेथील मासेमारी उद्योगावर परिणाम होणार नसेल, तरूणांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार असेल तर या बाबीचाही विचार झाला पाहिजे. या प्रकल्पातून एक लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. विकासाच्या बाबतीत जनतेचा विरोध कशासाठी आहे, या ही गोष्टी विचारात घेतला पाहिजे. "

Ajit Pawar News :
Ajit Pawar News : बारसुप्रकरणात अजित पवारांची समन्वयाची भूमिका; म्हणाले, "प्रकल्पामुळे रोजगार...

"या प्रकल्पामुळे कायमचं नुकसान होणार असेल तर त्या बाबतीत विचार झाला पाहिजे. मात्र या उलट या प्रकल्पामुळे फायदा होणार असेल, आर्थिक सुबत्ता येणार असेल, तर सकारात्मक विचार केला पाहिजे, प्रकल्पाच्या भागाचं नुकसान होणार नसेल, तर विरोध करणाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे," असेही अजित पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com