Kothrud Political News : कोथरूड भाजपमध्ये 'गटबाजी'चं वादळ,नेतृत्वानं टोचले 'या' नेत्यांचे कान

Medha Kulkarni News : चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमावरून कोथरूडमध्ये उफाळली गटबाजी...
Medha Kulkarni - Murlidhar Mohol - Chandrakant Patil
Medha Kulkarni - Murlidhar Mohol - Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

मंगेश कोळपकर -

Pune : कोथरूड मतदारसंघाच्या माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमात डावलल्याचा आरोप करत उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. भाजपसारख्या शिस्तप्रिय पक्षातील गटबाजी अशाप्रकारे चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

कार्यक्रम पार पडला पण यानंतर कोथरूडचे राजकारण तापले होते. स्थानिक पदाधिकारी पुनीत जोशींनी मेधा कुलकर्णींवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी देखील केली होती. पण आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कोथरूडच्या गटबाजीची दखल घेतली आहे.

Medha Kulkarni - Murlidhar Mohol - Chandrakant Patil
Medha Kulkarni news : मेधा कुलकर्णींवर कारवाई करा ; आरोप-प्रत्यारोपाचे मोहोळ उठले..

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कार्यक्रमावरून कोथरूड विधानसभा मतदारसंघात सोशल मीडियावर उफाळलेल्या गटबाजीची दखल घेतली आहे. याबाबत संबंधितांशी संवाद साधून शहराध्यक्षांनी त्यांना कान टोचल्याचे समोेर आले आहे.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी झाले. तत्पूर्वी या कार्यक्रमांच्या नियोजनात तसेच माहिती पत्रकांवर स्थान न मिळाल्याबद्दल आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून डावलले जात असल्याची खंत पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी(Medha Kulkarni) यांनी फेसबुकवरील एका पोस्टद्वारे व्यक्त केली होती.

Medha Kulkarni - Murlidhar Mohol - Chandrakant Patil
Eknath Shinde & Fadnavis : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांच्या 'या' शिलेदाराची एन्ट्री ; मान झेंडावंदनाचा,पण चर्चा पालकमंत्रिपदाची...

कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनीही फेसबुक पोस्टद्वारे कुलकर्णी यांचे मुद्दे खोडून काढत शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या २४० होर्डिंग्जवर त्यांचे फोटो होते, असे स्पष्ट केले. तसेच शिस्तीच्या पक्षात श्रेयवादावरून जाहीररित्या नाराजी व्यक्त केल्याबद्दल भाजप कार्यकर्ते नाराज झाल्याचे त्यांनी म्हटले होते. पाठोपाठ भाजप(BJP)च्या आणखी काही कार्यकर्त्यांनी या वादात फेसबुक पोस्टद्वारे उडी घेतली.

या पार्श्वभूमीवर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे(Dheeraj Ghate) म्हणाले, चांदणी चौकातील कार्यक्रमावरून कुलकर्णी आणि जोशी यांनी सोशल मीडियावर केलेली वक्तव्ये पक्षासाठी बरोबर नाहीत. त्याची दखल पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. तसेच दोन्ही घटकांशी चर्चा करण्यास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा केली आहे. यापुढे असे प्रकार होऊ नयेत, यासाठीही उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com