Eknath Shinde & Fadnavis : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांच्या 'या' शिलेदाराची एन्ट्री ; मान झेंडावंदनाचा,पण चर्चा पालकमंत्रिपदाची...

Thane Political News : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपच्या वाट्याला जाण्याच्या चर्चेला उधाण
Eknath Shinde -Devendra Fadnavis
Eknath Shinde -Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

शर्मिला वाळुंज

Dombivali Political News : शिंदे- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात डोंबिवलीतील भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा हे महत्त्वाचे खाते सोपविण्यात आले. याचवेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यांनाच मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद गेले.

आता राज्य सरकारने १५ ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची यादी जाहीर केली असून त्यात ठाणे जिल्ह्यासाठी चव्हाण यांचे नाव जाहीर केले आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपच्या वाट्याला जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Eknath Shinde -Devendra Fadnavis
Thackeray Group Slams CM Eknath Shinde : अजितदादा सरकारमध्ये घुसल्याने मुख्यमंत्री शिंदेंच्या हृदयाचे ठोके वाढले...

राज्यात पालकमंत्रीपदावरून नाराजीनाट्य सुरु असतानाच जिल्ह्यातील ध्वजारोहणाचा मान इच्छुकांना देत शिंदे - फडणवीसांनी सुरू असलेल्या 'मानापमान' नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे जिल्ह्याच्या ध्वजारोहणाचा मान हा शिवसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना न देता भाजपचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण(Ravindra Chavan) यांना देण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे निकटवर्तीय म्हणून चव्हाण यांची ओळख आहे.

काही दिवसांपासून कल्याण- डोंबिवलीतील विकास कामावरून मंत्री रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांच्यात टोकाची धुसफूस सुरु झाली. फडणवीस यांच्या काळात डोंबिवलीतील रस्ते कामांसाठी 472 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला होता. मात्र, नगरविकासमंत्री असताना एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी हा निधी खुला केला नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली होती. हा निधी वितरीत न करता खासदार शिंदे यांनी केडीएमसीसाठी याच कालावधीत 300 कोटींचा निधी मंजूर करुन घेतला.

Eknath Shinde -Devendra Fadnavis
MNS Warning to Amit Jani: असले तमाशे ताबडतोब बंद करा..; सीमा हैदरवर चित्रपट बनवणाऱ्या अमित जानीला मनसेचा थेट इशारा

यावर शिंदे व चव्हाण यांच्यातील वाद टिकेला पोहोचला होता. तसेच खासदार शिंदे यांनी भाजपमधील काही नगरसेवकांना शिवसेनेत आणण्याचा सपाटाच लावला होता. तसेच सुतिका गृहाचा मुद्दा असो की अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रश्न असो यामध्ये चव्हाण यांची कोंडी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुत्राच्या आग्रहास्तव केल्याची चर्चा होती. केडीएमसी मध्ये चव्हाण यांना साथ देईल असा अधिकारी येऊ द्यायचा नाही असा चंगच शिवसेनेने बांधल्याची चर्चा भाजपा गोटातून सुरु होती.

या सर्व घडामोडी पाहता जिल्ह्यातील विशेषतः कल्याण डोंबिवलीतील राजकारणा वरील राजकीय पकड शिंदे यांनी अजिबात ढिली होऊ दिली नाही. आणि मुख्यमंत्री पुत्राच्या आग्रहामुळेच चव्हाण यांची पालकमंत्रिपदाची संधी हुकल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात भाजपला राजकीय मोकळीक न देता शिंदे यांनी ऐन वेळी देसाई यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले. यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता होती. यानंतर भाजपचे चव्हाण आणि शिंदे यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याच्या चर्चेला उधाण येऊ लागले.

Eknath Shinde -Devendra Fadnavis
Attack on Asaduddin Owaisi's house : घरावरील हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसींनी पंतप्रधानांना ललकारले; म्हणाले...

कल्याण लोकसभा मतदार संघावरील दावा आणि डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे प्रकरणावरून तर हे वितुष्ट चव्हाट्यावर आले. त्यातही खासदार शिंदे यांनी राजीनामा द्यायची तयारी दाखवत मुख्यमंत्री शिंदे व पुत्र शिंदे यांनी दिल्लीतील भाजपा वरिष्ठांशी चर्चा करत फडणवीस व चव्हाण यांना दोन पावले मागे येण्यास भाग पाडल्याचे बोलले जात आहे. हा वाद शमला असला तरी भाजपने राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी जाहीर करताना चव्हाण यांच्या शब्दाला मान देत ते बोलतील ते धोरण असा पवित्रा घेत त्यांचे ठाणे जिल्ह्यातील वजन वाढविण्यावर भर दिला. तसेच चव्हाण यांनीही अनेक बैठका घेत आपली राजकीय पकड मजबूत केली.

ठाण्याचे विद्यमान पालकमंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) हे पालकमंत्री झाल्यापासून मोजून चार ते पाचवेळा जिल्ह्यात दौऱ्यावर आले असतील. ठाणे येथील कळवा रुग्णालयात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यु होतो. एवढी मोठी घटना घडूनही पालकमंत्री देसाई जिल्ह्यात फिरकले देखील नाहीत. यामुळे पालकमंत्र्यांवर जिल्ह्यातील नागरिकांची नाराजी आहे. पालकमंत्री हरवले आहेत असे बॅनर देखील मध्यंतरी विरोधीपक्षांनी शहरात लावले होते.

Eknath Shinde -Devendra Fadnavis
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंना मोठा झटका ? 40 गटप्रमुख,10 उपशाखाप्रमुखांसह 150 शिवसैनिक राजीनामा देण्याच्या तयारीत...

राज्यात पुन्हा सत्तांतर झाले असून शिंदे, फडणवीस व पवार यांचे सरकार आले आहे. नव्याने सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीचे अजित पवार गटासाठी पालकमंत्रीपदाचा विस्तार करण्याच्या हालचाली सध्या सुरु आहेत. यावरुन नाराजीनाट्य राज्यात सुरु आहे. राज्य सरकारने झेंडा वंदनासाठी जाहीर केलेल्या मंत्र्यांच्या यादीत ठाणे जिल्ह्याचा मान मंत्री चव्हाण यांना दिला आहे.

जिल्हा प्रशासनाने देखील मंत्री चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचे जाहीर करत कार्यक्रमाची आखणी केली आहे. ध्वजारोहणाच्या यादीमुळे पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com