Pune Girl Attack : सदाशिव पेठेतील थरारक घटनेत तरुणीचा जीव वाचविणाऱ्या धाडसी युवकाचं राहुल गांधींशी कनेक्शन...

Pune Sadashiv Peth Crime News : पुण्यात तरुणीसह तिच्यासोबतच्या तरुणावर एका माथेफिरूने कोयत्याने वार करून परिसरात दहशत माजवली होती.
Pune Girl Attack
Pune Girl AttackSarkarnama
Published on
Updated on

Pune : पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच गजबजलेल्या सदाशिव पेठेत मंगळवारी (दि.२७) एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने बाईकवर असणाऱ्या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. मात्र, स्थानिक तरुणांनी मोठ्या धाडसानं हल्लेखोर विकृत तरुणाला पकडलं आणि तरुणीचा जीव थोडक्यात वाचला. आता तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय. आता त्या दोन तरुणांपैकी एका जणाचं थेट 'भारत जोडो' यात्रेशी कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे.

पुण्यातील सदाशिव पेठ येथे तरुणीसह तिच्यासोबतच्या तरुणावर एका माथेफिरूने कोयत्याने वार करून परिसरात दहशत माजवली. हा थरारक प्रसंग घडत असताना सभोवतालचे लोक बघ्याची भूमिका घेत पाहत राहिले. मात्र, याचवेळी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या दोन युवकांनी धाडसानं वार करणाऱ्या मुलाला रोखलं. तसेच त्याला पेरुगेट पोलिसा(Police)च्या स्वाधीन केलं. तरुणांच्या या धाडसामुळे एका तरुणीचा जीव वाचला. या त्यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनात दोन्ही तरुणांचा सत्कार केला.

Pune Girl Attack
Pune News: कळमोडी धरणातील पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण; आढळराव पाटलांनी दिलं मोठं आश्वासन

काँग्रेस(Congress)भवनात सदाशिव पेठेतील घटनेत तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेखपाल चांगदेव जवळगे आणि हर्षद पाटील या दोन धाडसी युवकांचा युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल शिरसाठ यांच्या हस्ते मंगळवारी(दि.२७) सत्कार करण्यात आला. शिव छत्रपती प्रतिमा आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यातील लेखपाल जवळगे हा तरुण राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाला होता. तो राहुल गांधीं(Rahul Gandhi)नी भारत जोडो यात्रेतून अहिंसेचा केलेल्या प्रचार आणि प्रसारामुळे प्रभावित झाल्याचंही त्यानं सांगितलं.

जवळगे म्हणाला, राहुल गांधींनी जी कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोडो यात्रा काढली. त्यांनी पहाटे, उठून सर्वसामान्य जनतेसोबत चालत होते. तसेच या यात्रेत त्यांनी अहिंसेचा पुरस्कार केला. मात्र, सध्या देशात राजकीय नेतेमंडळींकडून धार्मिक तेढ निर्माण केली जात आहे. पण राहुल गांधीना बदनाम करण्यासाठी जेवढी ताकद वापरली गेली असेल तितकी आजपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याला वापरली गेली नसेल असंही जवळगे यावेळी म्हणाला.

Pune Girl Attack
Anand Paranjpe News : तथाकथित आपले सरकार, गतिमान सरकारचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ : आनंद परांजपेंचा हल्लाबोल

यातील लेशपाल जवळगे हा युवक दोन दिवस भारत जोडो यात्रेत सहभागी झाला होता. सत्काराला उत्तरं देताना लेशपाल याने राहुलजी गांधी यांच्या विचारांनी आपण प्रभावित असल्याचे सांगितले. गांधी नेहरुंच्या विचारांवरच हा देश पुढे जाऊ शकतो. निर्भयता हा गूण आपण महात्मा गांधींच्या चरित्रातून घेतला असल्याचे सांगितले.

थरारक घटनेत नेमकं काय घडलं?

राज्यात सहावी आलेली दर्शना पवार (Darshana Pawar) च्या हत्येची घटना ताजी असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर एका तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले आहे.

संबंधित तरुणी आज सकाळी कॉलेजला निघाली होती. यावेळी तरुणीसोबत तिचा दुसरा मित्रही होता. सदाशिव पेठेतून जात असताना तरुण त्यांच्या मागून आला आणि अचानक तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी तरुणाने , तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केल्याने ती जखमी झाली. जीव मुठीत घेऊन पळत सुटली. तिचा मित्रही कोयता घेऊन तिच्या मागे पळत होता. ती मदत मागत होती. पण तिच्या मदतीसाठी कुणीही पुढे आलं नाही.

Pune Girl Attack
Ramdas Athwale On Fadnavis : रामदास आठवलेंकडून थेट फडणवीसांच्या टीकेला छेद ; म्हणाले,'' पवारांची ती खेळी ही मुत्सद्देगिरीच...''

पण ती पळत असताना एक तरुण तिच्या मदतीसाठी धावून आला. कोयता हातात असलेला तरुण तरुणीच्या डोक्यावर वार करणार एवढ्यात मदतीसाठी धावून आलेल्या तरुणाने त्याचा कोयता धरला त्याला रोखलं. यानंतर इतर लोक पुढे सरसावले आणि हल्लेखोराला चोप दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com