Dhananjay Desai News : शेतकरी कुटंबाला धमकावणं 'हिंदू राष्ट्र सेने'च्या धनंजय देसाईंना भोवलं ; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Pune Crime News : देसाई यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात १७ गुन्हे दाखल
Dhananjay Desai
Dhananjay Desai Sarkarnama
Published on
Updated on

Pune : पौड परिसरातील दारवली गावातील एका शेतकरी कुटंबाला जमीन धनंजय देसाईच्या नावावर करून न दिल्याने बेदम मारहाण करत धमकावल्याची घटना घडली होती. ऑगस्ट महिन्यात ही घटना घडली होती. या प्रकरणी आता हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईला चांगलंच भोवण्याची शक्यता आहे. न्यायालयाने देसाई यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांना हा आदेश दिला आहे.

याबाबत प्रदीप शिवाजी बलकवडे (वय ३५, रा. दारवली, ता. मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंसह सात जणांवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. देसाई यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात १७ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये जातीय तेढ निर्माण करणे, खून, हत्यार कायद्यांचे उल्लंघन अशा गुन्‍ह्यांचा समावेश आहे.

Dhananjay Desai
Pimpri Chinchwad Bandh: जालन्यातील लाठीमाराच्या निषेधार्थ शनिवारी पिंपरी-चिंचवड बंदची हाक ; महायुती वगळता इतर पक्षांचा पाठिंबा

काय आहे घटना...?

पौड परिसरातील दारवली गावातील प्रदीप बलकवडे गावातील सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी देसाईंचे साथीदार घरात शिरले. देसाई यांच्या नावावर जमीन का करुन दिली नाही, अशी विचारणा करुन त्यांना धमकावले. जमीन नावावर करुन न दिल्यास तुझ्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. बलकवडे यांना श्याम सावंतने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली. (Latest Marathi News)

न्यायालयात काय घडलं...?

सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी पौड महिन्यातील मारहाण आणि धमकावल्या प्रकरणी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यावेळी त्यांनी गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. गुन्ह्यात वापरलेल्या पिस्तुलाचा तपास करायचा आहे. घटना घडल्यानंतर चर्चा करताना धनंजय देसाई(Dhananjay Desai) सीसीटीव्हीमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. तर फिर्यादी यांच्यावतीने ॲड. अमेय बलकवडे, ॲड. सतीश कांबळे आणि ॲड. सूरज शिंदे यांनी युक्तिवाद केला.

Dhananjay Desai
Mohan Bhagwat On Reservation : ''... तोपर्यंत आरक्षण राहील आणि संघ याचं समर्थन करतो! ''; सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान

हिंदुराष्ट्र सेनेच्या देसाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक...

धनंजय देसाई याने बारा वर्षांपूर्वी पौड भागात अतिक्रमण करुन घर बांधले. देसाई हिंदू राष्ट्र सेना चालवत असून त्याच्याविरुद्ध गंभीर गु्न्हे दाखल झाले आहेत. मुळशी तालुक्यात देसाई आणि साथीदारांनी दहशत माजवली आहे.

गोशाळेच्या नावाखाली पाळीव जनावरे शेतात सोडून दिली जातात. देसाईला जाब विचारल्यास तो ग्रामस्थांना धमकावतो. संघटनेच्या नावाखाली तो समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे. त्याने दारवलीलीत हुलावळेवाडीतील तरुणांना मारहाण केली होती, असे दारवली ग्रामस्थांनी दिलेल्या प्रसिद्धीस पत्रकात म्हटलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com