PCMC News : प्रकल्प सिद्धीमुळे पिंपरी महापालिकेच्या उत्पन्नात झाली कोट्यवधींची वृध्दी

Pimpri-Chinchwad : आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटी मिळकत तथा मालमत्ता कर वसुली मोहीम महापालिकेकडून तीव्र केली जाते.
PCMC News
PCMC NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटी मिळकत तथा मालमत्ता कर वसुली मोहीम महापालिकेकडून तीव्र केली जाते. त्यासाठी प्रसंगी मिळकतही जप्त केल्या जातात. पण, २०२३-२४ या आर्थिक वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेने या कर वसुलीसाठी वेगळाच फंडा अंमलात आणला. त्यामुळे पहिल्या तीन महिन्यांतच पन्नास टक्के मिळकतधारकांनी साडेचारशे कोटी रुपयांचा कर जमा केला.

पिंपरी महापालिकेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची विक्रमी करवसुली ठरली. त्याबद्दल प्रशासनाने महिला बचत गटांचे खास अभिनंदन केले आहे. कारण त्यांच्यामुळे हे उत्पन्न कमी कालावधीत पालिकेला मिळाले आहे. या वर्षापासून मिळकतकर बिलवाटपाचे काम महिला गटांकडे पालिकेच्या करसंकलन विभागाने सोपविले.

PCMC News
Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडला, तर लोक म्हणतात, 'देवेंद्रवासी झाला' ; पवारांचा निशाणा

प्रकल्प सिद्धी असे नाव या प्रकल्पाला दिले. सिद्धिकडून वृध्दिकडे' ही त्याची टॅगलाईन होती. हा निर्णय पालिकेसाठी खरोखर मैलाचा दगड शाबीत झाला, अशी प्रतिक्रिया प्रशासनाने आज दिली. वेळेत बिले मिळाल्यामुळे वेळेत नाही, तर वेळेआधी कराचा भरणा झाला, असे करसंकलन विभागातून सांगण्यात आले.

अवघ्या 90 दिवसांत 447 कोटी रुपये पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकर रुपाने जमा झाले. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे त्यातील तब्बल २९१ कोटी ८१ लाख रुपयांचा करभरणा हा ऑनलाईन झाला आहे. उद्योगनगरी असली, तरी त्यात पिंपरी-चिंचवडला (Pimpri-Chinchwad) निवासी मिळकतधारकांनीच सिंहाचा वाटा (2 लाख 68 हजार 6) उचलला आहे.

निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा 6 लाख 2 हजार 203 नोंदणीकृत मालमत्ताधारकांपैकी पन्नास टक्के म्हणजे 3 लाख 3 हजार 350 जणांनी तीन महिन्यांतच 447 कोटी 3 लाख 96 हजार रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे. १७ करसंकलन कार्यालयांपैकी आयटीयन्स वास्तव्याला असलेल्या वाकड झोनमध्ये सर्वाधिक 39 हजार 600, सांगवीत 34 हजार 694, चिंचवडला 29 हजार 303, तर थेरगावमध्ये 28 हजार 368 मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये 4 हजार 131 मालमत्ताधारकांनी कर भरला आहे.

PCMC News
Sharad Pawar on Buldhana Bus Accident: पाच लाख रुपये देऊन प्रश्न मिटणार नाही..; शरद पवारांनी राज्य सरकारला फटकारले

या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व श्रेय जबाबदार, प्रामाणिक आणि जागरूक करदात्यांना असल्याचे सांगत पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसेच हा कररुपी पैसा शहराच्या शाश्वत विकासाचा पाया राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. त्यातून शहराच्या पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या होतील, यावर मी वैयक्तिक लक्ष देईल, असे ते म्हणाले. तर, हे सांघिक यश आहे, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली. शहर अधिक सुंदर, होण्यासाठी यातून दक्षता घेतली जाईल, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com