Sunil Tingre News : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध मूलभूत प्रश्नांबाबत आमदार सुनिल टिंगरे उपोषणाला बसणार आहेत. टिंगरे यांनी या संदर्भात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवदेन दिले आहे. वडगाव शेरीत नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा निवेदन देवून सुद्धा या प्रश्नावर कोणताही तोडगा निघत नसल्याने तेथील नागरिक प्रलंबित मागण्यासाठी 6 एप्रिल पासून उपोषणाला बसणार आहेत. याबाबत टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. वारंवार पाठपुरावा करून देखील हे काम होत नसल्याने आमदार टिंगरे यांनी हा इशारा दिला आहे.
आमदार टिंगरे म्हणाले , “सातत्याने आपल्याकडे बैठका, प्रत्यक्ष भेट आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा केला. तसेच विधिमंडळ अधिवेशनातही या प्रश्नांकडे मी शासनाचे लक्ष वेधले आहे, असे असतानाही या प्रश्नांची आपल्याकडून दखल घेतली जात नाही. प्रत्येक वेळेस केवळ आश्वासने देली जातात . मात्र, आता मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न इत्यादीनी गंभीर रूप धारण केले असून. आपणाकडून त्यावर काहीच कारवाई होत नसल्याने अखेर नाईलाजास्तव मतदारसंघातील नागरिकांसोबत महापालिका भवनासमोर उपोषणाला बसण्याचा निर्धार केलेला आहे.” अशा शब्दात टिका केली आहे.
सुनिल टिंगरेंनी केलेल्या मागण्या :
1) पोरवाल रोड वाहतूक कोंडी
2 एअरफोर्स जागेतील ते धानोरी रोड
3) नदी काठचा प्रलंबित रस्ता
4) विश्रांतवाडी चौकातील बुद्धविहार स्थलांतरित करणे.
5) नगर रोड वाहतूक कोंडी
6) लोहगावचा पाणी प्रश्न
7) खंडोबा माळरोड व इतर डीपी रोड
8) सिद्धार्थनगर झोपडपट्टी पुनर्वसन
9) धानोरी लक्ष्मी टाऊनशिप ते लक्ष्मी स्मशानभूमी रोड
10) धानोरी सर्वे नं. 5 ते सर्वे नं. 12 रस्त्याची दुरूस्ती
11) धानोरी पेलेडीयम रोड ते सर्वे नं. 6 रस्त्याची दुरूस्ती `
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.