Baramati APMC News : राष्ट्रवादीची ताकद मोठीच; पण आव्हान देण्याचा भाजपचा प्रयत्नही तितकाच मोठा !

NCP vs BJP : निवडणुकीच्या रिगंणात १७ जागांसाठी ३४ उमेदवार
BJP, NCP
BJP, NCPSarkarnama
Published on
Updated on

Baramati Bazar Samiti Election : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत कायम राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. दरम्यान गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप आणि मित्र पत्र पुरस्कृत पॅनेलने सुमारे ३५ टक्क्यांहून अधिक मते घेतली होती. या निवडणुकीतही भाजप व मित्र पक्षांनी १८ पैकी १६ जागांवर उमेदवार देऊन राष्ट्रवादीपुढील आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

BJP, NCP
Daund APMC News : दौंड बाजार समितीत कुल-थोरात आमने-सामने; बाजी कोण मारणार?

या निवडणुकीत राष्ट्रवादी (NCP) पुरस्कृत रयत पॅनल तर भाजप आणि मित्र पक्ष पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल आमने-सामने लढणार आहेत. या दोन्ही पॅनेलकडून सुरुवातीला १८ जागांसाठी ६४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. दरम्यान, अर्ज माघीरीच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता. २०) ३० उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे आता बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत.

BJP, NCP
Nanded Market Committee News : अशोक चव्हाणांनी महाविकास आघाडीची मोट बांधलीच ; एक उमेदवार बिनविरोध..

दरम्यान, राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत रयत पॅनलचे १७ तर भाजप (BJP) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. तर एक अपक्ष उमेदवार आहे. बारामती (Baramati) बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्विवाद सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे बाळासाहेब गावडे (Balasaheb Gawade), दिलीप खैरे, पांडुरंग कचरे, अविनाश मोटे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या पॅनेलच्या माध्यामातून उमेदवार देत राष्ट्रवादीपुढे आव्हान काय ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

BJP, NCP
Bazar Samiti Election : नीरेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी; ठाकरे गटाला एकही जागा नाही : आघाडीला युती देणार टक्कर

या निवडणुकीबाबत भाजपचे दिलीप खैरे (Dilip Khaire) म्हणाले की, "लोकशाहीत निवडणुकीला महत्व आहे. त्यामुळे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत आमच्या पॅनेलने सर्व ठिकाणी उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. सध्या आम्ही १६ जागांवर पूर्ण ताकदीने लढत देणार आहोत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्हाला ३५ ते ४२ टक्क्यांपर्यंत मते मिळाली आहेत. दरम्यान आम्ही केलेल्या कामांमुळे या निवडणुकीत जनता पाठिंबा देईल, असा विश्वास आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com