जगदीश मुळीकांची आता खरी कसोटी

आमदार टिंगरे यांचे मोठे आव्हान मुळीक यांच्यासमोर आहे.
मुळीक-टिंगरे
मुळीक-टिंगरे सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : महापालिका निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशा राजकीय हालचाली गतिमान होऊ लागल्यात. दिवाळीनंतर त्या आणखी गतीमान होतील.वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला आपली ताकद टिकवून ठेवावी लागेल.शहराध्यक्ष असलेल्या माजी आमदार जगदीश मुळीक यांचा हा घरचा मतदारसंघ असल्याने या मतदारसंघात पक्षाचे नगरसेवक कमी होऊ नये,याची जबाबदारी मुळीक यांच्यावरच राहणार आहे.विद्यमान आमदार सुनील टिंगरे विरूद्ध माजी आमदार जगदीश मुळीक असाच सामना या मतदारसंघात रंगणार आहे.

मुळीक-टिंगरे
निवडणुका जवळ आल्याने पुण्यात सुरू झालाय दिवाळी फराळांचा धडाका

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे खासदार गिरीश बापट यांना ५७ हजार मतांचे अधिक्य मिळाले होते. जगदीश मुळीक येथील आमदार होते. मात्र, अवघ्या वर्षभरात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुळीक यांना या मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. त्याआधी २०१७ साली झालेल्या महापालिका निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाचे बहुसंख्य नगरसेवक निवून आले होते. यातले बहुकेतजण कॉंग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करीत नगरेसवक झाले होते.

मुळीक-टिंगरे
पालखी महामार्गाच्या भूमीपूजनाला उद्धव ठाकरे येणार का?

दोन वर्षात परिस्थिती बदलली आहे.मुळीक यांचा पराभव करून निवडून आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील टिंगरे आमदार झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.महापालिका निवडणूक समोर ठेऊन गेल्या दोन वर्षात आमदार टिंगरे काम करीत आहेत. काहीही झाले तरी वडगाव शेरी मतदारसंघातून २४ पैकी १६ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

आमदार टिंगरे यांचे मोठे आव्हान मुळीक यांच्यासमोर आहे. मुळीक हे पक्षाचे शहराध्यक्ष आणि या मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. मागच्यावेळी झालेल्या पराभवाची सल त्यांच्या मनात कायम आहे. त्यामुळे काहीही करून यावेळी पुन्हा आमदार व्हायचेच ही त्यांची मनिषा आहे. मात्र, आमदार व्हायचे असेल तर महापालिका निवडणुकीत त्यांना आपली ताकद पुन्हा सिद्ध करावी लागणार आहे.त्यामुळे आमदार टिंगरे यांच्याप्रमाणेच मुळीक यांनादेखील किमान १६ नगरसेवक पुन्हा निवडून आणण्याचे टार्गेट ठेवावे लागेल.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com