पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने यावर्षीच्या दिवाळीत राजकीय पक्षाच्या दिवाळी फराळाचे पेव फुटले आहे. सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांची दिवाळी फराळाची लगबग सुरू असून मतदारांचाही उत्साही प्रतिसाद आहे.
पुणे महानगरपालिकची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. तीन सदस्यांचा प्रभाग निश्चित झाला असून दिवाळी संपताच प्रभाग रचनेचे काम सुरू होणार आहे.त्यामुळे अनेक इच्छुकांनी लोकसंपर्काची तयारी केली आहे. दिवाळी फराळ हा त्या लोकसंपर्काच्या प्रयत्नांचा भाग आहे.
पुण्यात लढताना महाविकास आघाडीतील तीन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे आघाडीतील प्रत्येक पक्षाला या इच्छुकांचा सामना करावा लागणार असून यातून बंडखोरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दिवाळी फराळानिमित्त तयार झालेल्या इच्छुकांच्या संख्येवरूत तशी शक्यता अधिक वाटत आहे.महाविकास आघाडीचा सामना भारतीय जनता पार्टीबरोबर होणार आहे, भाजपा महापालिकेत सत्तेत आहे. भाजपाला पुन्हा सत्तेत यायचे आहे तर काहीही करून महाआघाडीला सत्ता खेचून आणयाची आहे.
दिवाळी फराळाच्या माध्यमातून लोकसंपर्क मोहीम राबविवणारे काही इच्छुक कोणत्याचा पक्षाचा झेंडा घेताना दिसत नाहीत.अद्याप प्रभाग रचना व्हायची आहे. प्रभाग रचना सोयीची होती की गैरसोयीची यावरर सारेकाही अवलंबून आहे. त्यामुळे अनेक इच्छुक कोणत्या पक्षाकडून लढायचे याबाबत काहीच बोलत नाहीत.
आपल्या पक्षाने उमेदवारी दिली नाही तर इतर पक्षात जाण्याचा मार्ग मोकळा असल्याचे अनेकजण खासगीत बोलून दाखवत आहेत. काहीही करून नगरसेवक व्हायचेच असेच अनेकांनी मनोमन ठरवले असून त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. या विषयात थेटपणे कुणीच बोलायला तयार नाही. मात्र, तयारी प्रत्येकी सुरू असल्याचे दिवाळी फराळाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.