MPSC : टेम्पो चालकाचा मुलगा राज्यात प्रथम ; अथक मेहनत घेऊन प्रमोद चौगुलेने मारली बाजी

प्रमोद चौगुले याचे वडील बाळासाहेब चौगुले हे ड्रायव्हर होते. तर आई घरी शिवण काम करते.
Pramod Chougule
Pramod Chougulesarkarnama
Published on
Updated on

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (mpsc) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० चा निकाल जाहीर करण्यात आला असून, प्रमोद चौगुले (Pramod Chougule)हा राज्यात प्रथम आला आहे. निलेश कदम दुसरा तर, रुपाली माने हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

अंतिम निकालाची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली. मुलाखती संपल्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात आला. कोरोनाचा कहर सुरु असताना सांगलीत पुराने थैमान घातले होते अशा परिस्थितीत देखील डळमळीत न होता प्रमोदने अथक मेहनत घेऊन राज्यात बाजी मारली आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी येथील प्रमोद बाळासाहेब चौगुले यांचा एमपीएससीतील यशानंतर त्यांच्या सोनी येथील मूळ गावी आणि सांगलीतील घरी मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.

Pramod Chougule
बाबरी पाडली तेव्हा राज कुठे होते ? असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर मनसेचा हल्लाबोल

प्रमोद चौगुले याचे प्राथमिक शिक्षण सोनी झाले आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण पलूस येथील नवोदय विद्यालय झाले होते. त्याने कराड येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी घेतली. उच्चशिक्षित प्रमोद चौगुले याची भारत पेट्रोलियममध्ये निवड झाली होती.

चौगुले याने जामनगर येथे सेवा बजावली आहे. भारत पेट्रोलियममध्ये काम करत असताना येणार्‍या वेगळ्या अधिकार्‍यांच्या संपर्कातून त्याला स्पर्धा परीक्षेची प्रेरणा मिळाली. त्याने यूपीएससीची तयारी केली. परंतु त्यामध्ये यश आले नाही.

Pramod Chougule
Aurangabad : राज ठाकरेंच्या सभेसाठी दोन हजार वकीलांचा फौजफाटा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या राज्यसेवेच्या परीक्षेत मात्र त्याने केवळ दुसर्‍या प्रयत्नात घवघवीत यश मिळवत पहिल्या क्रमांकावर बाजी मारली. पहिल्या प्रयत्नात यांची एका मार्कात संधी हुकली होती. त्याची कसर भरून काढत पहिला क्रमांक पटकावला आहे.

प्रमोद चौगुले याचे वडील बाळासाहेब चौगुले हे ड्रायव्हर होते. तर आई घरी शिवण काम करते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत प्रमोद चौगुले यांनी यश मिळवले आहे. तर प्रमोद चौगुले याचे मेहुणे प्रसाद चौगुले हे गेल्यावर्षी जाहीर झालेल्या राज्यसेवेच्या निकालात राज्यात प्रथम आले होते.

त्यांचे सध्या पुण्यात उपजिल्हाधिकारी पदाचे प्रशिक्षण सुरु आहे. गेल्यावर्षी मेहुणे तर यावर्षी प्रमोद चौगुले हे राज्यसेवेच्या परिक्षेत राज्यात प्रथम आल्याने त्यांच्या कुटुंबात जल्लोषाचे वातावरण होते.

या परीक्षेत 612 गुण मिळवून प्रमोद बाळासाहेब चौगुले (Pramod Balasaheb Chougule) हा प्रथम आला आहे. त्यानंतर नितेश नेताजी कदम (Nitesh Kadam) हा 591 गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर रुपाली गणपत माने हिने (Rupali Mane) 580.25 गुण मिळवून मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

या परीक्षेद्वारे वर्ग एकची पदे भरण्यात येणार आहेत. या परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार ही पदे भरण्यता येणार नव्हती. तर इतर वर्ग एकची पदे भरण्यात येणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com