Vasant More News : ''...तर मनसेचा महाराष्ट्रातील पहिला खासदार मीच असेन !''; वसंत मोरेंचं बारामतीतून मोठं विधान

MNS Political News : मनसेने आता बारामती लोकसभा मतदारसंघाकडे मोर्चा वळवला.
Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
Raj Thackeray News, Vasant More News, MNS NewsSarkarnama

Baramati : आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच प्रमुख पक्षांनी लोकसभा जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. तर भाजपनेही निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना विशेष मार्गदर्शक सूचना देताना देशात 'अबकी बार चारशे पार' आणि राज्यात 'मिशन ४५' निश्चित केले आहे. त्यात आता मनसेही आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे दौरेही सुरू झाले आहेत. याचवेळी मनसे नेते वसंत मोरे यांनी मोठं विधान केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) 'अॅक्शन मोड'मध्ये आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांत सध्या त्यांचे दौरे सुरू असून, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं जय्यत तयारी सुरू केल्याचे दिसते. ठाणे, नाशिक, पुणे, कोकणातही मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठका घेतल्या. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी तगडा 'प्लान' केल्याचं सांगितलं जात आहे. याचवेळी मनसेने आता बारामती लोकसभा मतदारसंघाकडे मोर्चा वळवला आहेत.

Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
Ajit Pawar Group NCP Melava : कार्यकर्ते जिलेबी-भातावर ‘तुटून पडले’; पण उपाशी कार्यकर्त्यांनी नेत्यांनाच हासडल्या शिव्या...

मनसेचे बारामती लोकसभा प्रमुख वसंत मोरे (Vasant More) यांनी बारामतीत कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मोरे म्हणाले, पक्षाने संधी दिली तर महाराष्ट्रातील मनसेचा पहिला खासदार वसंत मोरे असेल. बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा घेणार आहे.

पुण्याचा खासदार होण्यासाठी मी इच्छुक...

वसंत मोरे म्हणाले, पुण्याचा खासदार होण्यासाठी मी इच्छुक आहे. माझ्या पक्षाने मला संधी दिल्यास यावर्षी महाराष्ट्रातील पहिला मनसे(MNS) खासदार हा वसंत मोरे असेल असं मला 100 टक्के वाटतं असेही ते म्हणाले.

Raj Thackeray News, Vasant More News, MNS News
A.P. Shah News : देशात 'असहिष्णु आणि जातीयवादी' शक्तींमध्ये वाढ ; माजी न्यायमूर्तींनी मोदी सरकारला फटकारले

अमित ठाकरेंकडे पुणे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. पुणे हा त्यापैकी एक मतदारसंघ आहे. पुण्यातून मनसेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी अमित ठाकरे(Amit Thackeray) यांच्यावर पुणे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यामुळे अमित ठाकरे हे मनसेच्या उमेदवारासाठी पुणे लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिल्यास पुण्यातील राजकारणात मोठे फेरबदल होणार असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com