Pimpri-Chinchwad: भोसरीत १३ ठिकाणी आखाड पार्टी; चार टन मटन अन्‌ दोन टन चिकन सव्वा लाख लोकांनी केलं फस्त

Mahesh Landge : भाजप आमदार लांडगेंच्या भोसरीतील आखाड पार्टीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही आखाड साजरा
MLA Mahesh Landge
MLA Mahesh LandgeSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : सध्या आखाड पार्ट्या जोरात आहेत. त्यातही भोसरी विधानसभा मतदारसंघात रविवारी रात्री एकाच वेळी १३ ठिकाणी झालेली आखाड पार्टी ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरली आहे. कारण या मेजवानीत तब्बल एक लाख ३७ हजार जणांनी तब्बल चार टन मटण आणि दोन टन चिकन फस्त केलं आहे.

भोसरीचे भाजप आमदार तथा पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष महेश लांडगे हे आमदार नसल्यापासून म्हणजे गेल्या १५ वर्षांपासून हा असा जंगी आखाड करीत आहेत. यावेळी त्यात भाजपचा नवा भिडू राष्ट्रवादी काँग्रेसचेही काही कार्यकर्ते सामील झाले. त्यामुळे तो आणखी वेगळा ठरला.

मतदारसंघातील गरिब, कष्टकरी, चाकरमानी यांच्यासाठीच्या या आखाडात आपुलकीने नागरिक या सामिष स्नेहभोजनासाठी सहभागी होतात. याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया आमदार लांडगे यांनी यावर दिली.

MLA Mahesh Landge
Sunil Shelke Facebook Post: अजितदादांबरोबर गेलेले आमदार सुनील शेळकेंचे शरद पवारांवरील प्रेम असे झाले व्यक्त

जंगी इव्हेंट यशस्वी करण्याची ख्याती झालेले आमदार लांडगेंनी देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत गेल्या वर्षी भोसरीत घेतली. तशीच जंगी आखाड पार्टी ते दरवर्षी देत आहेत. त्यांचा प्रत्येक कार्यक्रम हा ‘ग्रँड सेलिब्रेशन’ असतो. कुठलाही अनुचित प्रकार ते व त्यांची टीम आपल्या कार्यक्रमात होऊ देत नाहीत. त्याची दक्षता घेतात.

MLA Mahesh Landge
NCP Crisis : चाळीस वर्ष सोबत राहून वळसेंना पवारांची भूमिका कळली नाही ? ; रोहित पवारांचे सडेतोड उत्तर

तशीच ती रविवारी रात्री झालेल्या आखाड पार्टीतही घेतली गेली. त्यात कोणीही मद्यपान करणार नाही व त्यातून गैरप्रकार व गडबड गोंधळ होणार नाही. याची पूर्ण काळजी घेण्यात आल्याने ती ग्रॅण्ड सक्सेस ठरली. तिचे नियोजन आमदार लांडगे समर्थक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेले होते. शाकाहारींसाठी व्हेज जेवणाचा वेगळा खास मेन्यू आणि टेबलं होती. त्यात स्वीट डिशही होती.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com