मोठी बातमी : पुणे शहरात पुन्हा निर्बंध लागू; ओमिक्राॅनचा धसका

पुणे शहरात (Pune city) रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
PMC issues new guidelines

PMC issues new guidelines

Sarkarnama

Published on
Updated on

पुणे, २५ : ओमिक्रॉनचा (Omicron) धोका वाढत असल्याने राज्य शासनाच्या आदेशानुसार विविध शहरांत निर्बंध लादण्यास सुरवात झाली आहे. पुणे महपालिकेनेही शहरात कोरोना प्रतिबंधक नियमावली लागू केली आहे. शहरात रात्री ९ ते सकाळी ६ या दरम्यान जमावबंदी लागू असणार आहे.

देशभरात आतापर्यंत सुमारे 400 ओमिक्राॅनचे रुग्ण आहेत. काही राज्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रातही संचारबंदीची शक्यता होती. मात्र राज्य सरकारने तातडीने संचारबंदी लागू करण्याऐवजी जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

PMC issues new guidelines

धोका वाढला..! एका पाठोपाठ एक भाजपशासित राज्यांत रात्रीची संचारबंदी

महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner) यांनी आज (ता. २५) काढले. खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डालाही हे नियम लागू असणार आहेत. हे आदेश आजपासून लागू करण्यात आले आहेत.

राज्यात ओमिक्रॉन रूग्ण वाढत असल्याने राज्य शासनाने शुक्रवारी (ता. २४) सुधारीत नियमावली लागू केली आहे. त्याचे आदेश महापालिकेला मिळाल्यानंतर हे आदेश काढले आहेत.

PMC issues new guidelines

ओमिक्राॅमचे भारतात फक्त 400 रुग्ण तरी अख्खा देश धास्तावलाय!

समारंभ, नाट्यगृह, खुल्या आणि बंदिस्त मैदानातील कार्यक्रमासाठी उपस्थितांची संख्या निश्‍चीत केली आहे. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहात १०० नागरिकाची मर्यादा असेल तर खुल्या मैदानात जास्तीत जास्त २५० जण किंवा जागेच्या क्षमतेच्या २५ टक्केपेक्षा कमी उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे.

सामाजिक,राजकीय, धार्मिक कार्यक्रमासाठीही उपस्थितीसाठी हेच बंधन असणार आहेत. हॉटेल, जीम, स्पाच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. आपत्ती निवारण कायद्यानुसार या नियमांचे पालन न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

PMC issues new guidelines

नितीन राऊतांना मोठा धक्का; काँग्रेसनं पद घेतलं काढून!

मुंबईत कारवाई कठोरपणे

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर कारवाईला मुंबईत वेग घेतला असून पालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल जमा जमा होत आहे. मुखपट्टी न वापरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड आकारला जात आहे. यात क्लिनअप मार्शल, मुंबई पोलीस आणि रेल्वे परिसरात केलेल्या कारवाही नुसार आतापर्यंत एकूण ४१ लाख ५६ हजार २९६ जणांकडून ८३ कोटी ६४ लाख ५० हजार ७७१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे

यात पालिकेच्या वेगवेगळ्या प्रभागात ३३ लाख ६८ हजार ५०९ जणांकडून एकूण ६६ कोटी ८६ लाख ३२ हजार ३७१ दंड गोळा केला आहे. तर मुंबई पोलिसांनी ७ लाख ६३ हजार ८९६ जणांकडून १५ कोटी २७ लाख ७९ हजार २०० रुपये जमा केले आहेत.रेल्वे परिसरात २३ हजार ८९१ जणांकडून ५० लाख ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मार्च २०२० पासून ही कारवाई सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com