Pune Assembly Election : शेतकऱ्यांनी मागितले तेव्हा तेव्हा शेतीसाठी पाणी दिले : दिलीप मोहिते पाटील

‘‘बैलगाडा शर्यतीसाठी अनेक वेळा मदत केली. तसेच, शेतकऱ्यांनी मागितले तेव्हा तेव्हा शेतीसाठी पाणी दिले
Dilip Mohite
Dilip Mohitesarkarnama
Published on
Updated on

राजगुरुनगर : ‘‘बैलगाडा शर्यतीसाठी अनेक वेळा मदत केली. तसेच, शेतकऱ्यांनी मागितले तेव्हा तेव्हा शेतीसाठी पाणी दिले. त्यामुळे तमाम शेतकरीवर्ग आपल्या पाठीशी असून, विधानसभेला आपलीच बारी बसणार,’’ असा विश्वास महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.‌

रेटवडी (ता. खेड) येथील चारुंबा देवाच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित बैलगाडा शर्यतीच्या घाटात शनिवारी (ता. ९) आमदार मोहिते पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘जनतेची कामे केल्याने मला जनतेने तीन वेळा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचे काम केले.

आलेल्या माणसाला तो कोणत्या जाती धर्माचा आहे, हे कधीही विचारले नाही, की गावच्या कोणत्या पुढऱ्याला घेउन ये, असे कधी म्हटलो नाही. प्रत्येक माणसाचे काम करत आलो. लोक कामासाठी केव्हाही फोन करतात, लगेच त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करतो. रात्रंदिवस तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम मी करतो असतो.’’

‘‘शेतकऱ्यांनी मागितले तेव्हा तेव्हा शेतीसाठी पाणी दिले. या परिसरातील लोकांनी माझ्याकडे येऊन पाणी नसल्यामुळे कांद्याची रोपे सुकून चाललीत आणि कांदा लागवड रखडली आहे, अशी समस्या मांडली. कालव्याला पाणी सोडायला सांगा, अशी मागणी केली.

शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन करून सांगितले. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना फोन करून सांगितले. लगेच सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांनी पत्र तयार केले.

शेतकऱ्यांच्या समस्या ताबडतोब सोडवण्याचा माझा प्रयत्न असतो. शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याची तक्रार केल्याकेल्या फोनवरच सांगून अनेक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर बदलण्याचे काम मी केलेले आहे,’’ असे मोहिते म्हणाले.

विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भलतेच मुद्दे काढून विरोधक माझ्यावर टीका करत आहेत. पण त्यांनी कोणती कामे केली, हे ते सांगत नाहीत, कारण त्यांनी काही केलेलेच नाही. फक्त निवडणुका आल्या की लोकांसमोर यायचे, भाषणे ठोकायची,

लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा आणि मते मिळवण्याचा प्रयत्न करायचा, एवढेच यांचे काम आहे. नुसत्या पोकळ गप्पा मारुन आश्वासने देण्यापलीकडे यांनी काही करता आले नाही, अशी टीका मोहिते यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com