Bhor Gram Panchayat Election : थोपटे विरुद्ध मांडेकर संघर्ष पुन्हा पेटणार, 26 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक रंगणार

thopte mandekar election battle maharashtra villages : थोपटे आणि मांडेकर यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटणार असून 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राजकीय रंगत वाढण्याची शक्यता आहे.
Bhor Gram Panchayat Election News
Bhor Gram Panchayat Election NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त झालेल्या ९ थेट सरपंच पदांसह ३४ सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, ३० मार्च रोजी तहसीलदार कार्यालयाकडून अधिकृत नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारांना ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी १५ एप्रिल रोजी होईल, तर १७ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल.

Bhor Gram Panchayat Election News
Dhangar Reservation News : धनगर आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटीलही उतरणार; उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडेंच्या भेटीसाठी मुंबईला रवाना!

निधन, राजीनामा आणि इतर विविध कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. पोटनिवडणूक जाहीर झाल्याने भोर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, गावागावात रणनीती आखली जात आहे. रिक्त जागांसाठी प्रबळ, सर्वसमावेशक आणि स्थानिक मुद्द्यांना बळकटी देणारे उमेदवार उभे करण्यावर सर्वांचा भर दिसून येत आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भोर मधील भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. मागील काही निवडणुकांमध्ये भाजपचे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर असा राजकीय संघर्ष रंगाचा पाहायला मिळाला आहे.

Bhor Gram Panchayat Election News
Crime News : भाजप नेत्याच्या मुलाचे सेक्स स्कँडल समोर; 25 मुलींचे शोषण, अश्लील व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; पोलिसांची मोठी कारवाई!

थोपटेंचा बालेकिल्ला असलेल्या भोरमध्ये गेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने थोपटे स्थानिक पातळीवरचा आपला वर्चस्व पुन्हा दाखवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com