CM Fadnavis visit : CM फडणवीसांच्या दौऱ्यासाठी वाहतूक वळवली; बदललेल्या रस्त्याने घेतला शिक्षिकेचा बळी?

Traffic Diversion for CM Fadnavis Visit Leads to Teacher’s Death : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासाठी वाहतूक वळवण्यात आली होती. बदललेल्या रस्त्यामुळे शिक्षिकेचा बळी गेला का? गंभीर प्रश्न उपस्थित.
CM Fadnavis visit : CM फडणवीसांच्या दौऱ्यासाठी वाहतूक वळवली; बदललेल्या रस्त्याने घेतला शिक्षिकेचा बळी?
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारे अपघात हे राज्यभरात चर्चेचा विषय बनत आहे. पुण्यातील नवले पूल असो अथवा कात्रज कोंढवा रस्ता हा तर मृत्यूचा सापळा बनला आहे. गेला साडेचार वर्षांमध्ये कात्रज कोंढवा रस्त्यावर 25 हुन अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आज सकाळी झालेल्या एका अपघातात एका महिला शिक्षिकेला आपला जीव गमवावा लागला.

आज सकाळी इस्कॉन चौकाजवळील हनुमान मंदिर परिसरात झालेल्या अपघातात एका महिलेला गंभीर इजा झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून, मृतकाचे नाव रमा कापडी (वय ५३, रा. कात्रज-कोंढवा रोड) असे आहे. त्या जे.एस.पी.एम.मध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले असून, सध्या आई-मुलगी एकत्र राहत होत्या. आईच्या अपघातामुळे आता मुलीसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

CM Fadnavis visit : CM फडणवीसांच्या दौऱ्यासाठी वाहतूक वळवली; बदललेल्या रस्त्याने घेतला शिक्षिकेचा बळी?
Top 10 News : तुकाराम मुंढेंचा विधानभवनातील ‘लक्षवेधी’ व्हिडीओ व्हायरल; पंकजा मुंडेंच्या 'पीए'ला पुन्हा अटक 'एसआयटी'ची मोठी कारवाई, वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात तीन हजार कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. यामध्ये कात्रज कोंढवा रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री या भागात येणार असल्यामुळे वाहतुकीत काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्याची वाहतूक तळ्याजवळ वळविण्यात आला आहे. आणि या वाळवलेल्या रोडचा अंदाज न आल्यामुळे मृत झालेल्या जे.एस.पी.एम मधील शिक्षिका रमा कापडी यांचा अपघात झाला असल्याचे बोले जात आहे.

याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी सांगितलं. कात्रज कोंढवा रोडच्या बेशिस्त वाहतुकीचा आज अजून एक बळी गेला आहे. आज कोंढवा रोड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण दुपारी माननीय मुख्यमंत्रीच्या हस्ते होत आहे. त्यामुळे रस्ता तळ्याजवळ वळविण्यात आला असल्याने रोडचा अंदाज न आल्यामुळे आमच्या भगिनी जे.एस.पी.एम मधील शिक्षिका श्रीमती रमाताई कापडी यांचे दुःखद निधन झाले. फक्त त्यांच्यापर्यंत ट्रॅफिक जाम झाल्यामुळे कोणालाच पोचता आले नाही आणि अति रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचे प्राण गेले. याला जबाबदार कोण. असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी केले होते. मात्र, सात वर्षांनंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमासाठी येत असल्याने रस्त्यावर वाहतूक वळवण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून या भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

CM Fadnavis visit : CM फडणवीसांच्या दौऱ्यासाठी वाहतूक वळवली; बदललेल्या रस्त्याने घेतला शिक्षिकेचा बळी?
Nitin Gadkari : संभाजीनगरकरांची प्रतीक्षा संपली! नितीन गडकरींनी सांगितला 'मेगा प्लॅन', शहराच्या विकासाला मिळणार 'बूस्टर डोस'!

या कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. याच कोंडीत घडलेल्या अपघातात एका 53 वर्षीय शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक वाहतूक बदलल्याने निर्माण झालेल्या कोंडीत मदत पोहोचण्यास विलंब झाला आणि त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. अशा परिस्थितीत हा रस्ता कधी पूर्ण होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. भूसंपादन आणि निधीच्या अडचणींमुळे रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com