देहू संस्थानच्या जुगारी विश्वस्ताची हकालपट्टी होणार : अध्यक्ष मोरेंनी दिले संकेत

विशाल मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे, देहूतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर चिंतामण टिळेकर, नगरसेविकेचा पती विशाल प्रतापसिंह परदेशी यांचा तीनपत्ती जुगार खेळणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
Gambling
GamblingSarkarnama

पिंपरी : श्री क्षेत्र देहू (Dehu ता. हवेली) येथील एका मोठ्या जुगार (Gambling) अड्‌ड्यावर बुधवारी (ता. ३ ऑगस्ट) पहाटे छापा टाकून पोलिसांनी तेथून २६ जुगाऱ्यांना पकडले होते. त्यांच्याकडून ३५ लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे देहू नगरपंचायतीचे एक नगरसेवक (corporator), एका नगरसेविकेचे पती आणि देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थान संस्थानच्या आजी, माजी विश्वस्तांचा या जुगाऱ्यांमध्ये समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली होती. (Trustee of Dehu Sansthan found gambling will be expelled)

दरम्यान, या सर्व जुगााऱ्यांनी जामीन दिल्यानंतर त्यांची बुधवारी रात्रीच उशीरा महाळुंगे पोलिसांनी सुटका केली आहे. मात्र, या पोलिस कारवाईतून देहू संस्थानची बदनामी झाल्याने या गुन्ह्यात अटक केलेले संस्थानचे विश्वस्त विशाल केशव मोरे यांची पदावरून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे संकेतही देवस्थान समितीचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिले.

Gambling
पंढरपुरातील राष्ट्रवादीचा बडा नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला; शहाजीबापूंनी लावली फिल्डिंग!

देहू संस्थानच्या विश्वस्तांचा त्या जुगाऱ्यांमध्ये समावेश असणे ही निंदनीय, धक्कादायक आणि चिंताजनक अशी ही घटना असून तसे घडायला नको होते, त्यामुळे जुगाराच्या गुन्ह्यात आरोपी विश्वस्तांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. तो पटला नाही, तर त्यांची हकालपट्टी केली जाईल. कारण तशी तरतूद संस्थानच्या घटनेत आहे. नैतिकता ढासळवणाऱ्या कृत्यात सहभागी व्यक्तीला पदावर ठेवता येत नाही, असे ते म्हणाले.

Gambling
सरन्यायाधीशांचे मोठं वक्तव्य : ‘उद्या कोणीही म्हणेल आम्ही दोन तृतीयांश असून पक्ष आहोत, हे लोकशाहीसाठी घातक’

विश्वस्त म्हणून नियुक्ती करताना ती पारखूनच केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, पांढऱ्या कपड्यावर छोटा, जरी काळा डाग पडला, तरी तो उठून दिसतो, अशा शब्दांत त्यांनी या प्रकाराबाबत खंत व्यक्त केली. कायदा सर्वांना सारखाच आहे, असेही ते म्हणाले. विशाल मोरे, माजी विश्वस्त संतोष गुलाब मोरे, देहूतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर चिंतामण टिळेकर, नगरसेविकेचा पती विशाल प्रतापसिंह परदेशी यांचा तीनपत्ती जुगार खेळणाऱ्यांमध्ये समावेश असल्याने देहू पंचक्रोशीत अद्याप त्याबाबत चर्चा सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com