Pimpri Chinchwad : घराणेशाहीला तीव्र विरोध करणाऱ्या भाजपसह सर्वच राजकीय पक्षात,मात्र ती सुरुच आहे. शिवसेनाही त्याला अपवाद नाही. ठाकरेंप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातही घराणेशाही कायम आहे. युवासेनेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य कार्यकारिणीतून आमदार,खासदारांच्या मुलांनाच संधी देण्यात आली असून निष्ठावान सर्वसामान्य कार्यकर्त्यांना,मात्र डावलण्यात आले आहे.
शिंदे शिवसेना प्रणित युवासेनेच्या वरील नियुक्तीतून पुन्हा एकदा घराणेशाहीवर शिक्कामोर्तब झाले. .त्यामुळे पक्षासाठी झटणाऱ्या आणि गॉडफादर नसलेल्या निष्ठावान सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सतरज्यांच उचलायच्या का अशी चर्चा शिवसेनेतच सुरु झाली आहे.युवा सेनेचे पदाधिकारी नेमताना पक्षाच्या आमदार, खासदार,मंत्र्यांची मुले आणि जवळच्या नातेवाईकांना संधी देण्यात आली आहे. त्याला विश्वजित बारणे यांच्या नियुक्तीने दुजोरा दिला. त्यांचे वडिल श्रीरंग बारणे (Shrirang Barne) हे पक्षाचे मावळचे खासदार आहेत.
राजकीय संन्यास घेतल्यानंतर आपली पत्नी,मुलगा,मुलगी यांना राजकारणात आणले,तर समजू शकतो.पण, आमदार,खासदार,मंत्री असूनही अनेकजण आपापले जवळचे नातेवाईकच लॉंच करीत राजकारणात घराणेशाही जपत आहेत. खासदार बारणे हे सलग तिसऱ्यांदा २०२४ ची लोकसभा (Loksabha Election) लढणार असून तशी घोषणा त्यांनी केली आहे. म्हणजे ते मैदानात असतानाच त्यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून मुलगा विश्वजीत याला पुढे आणले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत त्याला उभे करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याजोडीने संघटनेतही त्याला मानाचे पद नुकतेच मिळवून दिले.आता ते त्याने त्याच्या कामाच्या जोरावर मिळवले असेही नंतर सांगितले जाईल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
विश्वजीत बारणेंचे प्रमोशन
विश्वजीत हे पिंपरी-चिंचवड युवासेना प्रमुख होते. आता त्यांना प्रमोशन देऊन त्यांची नियुक्ती विभागीय सचिवपदी करण्यात आली. त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक (त्यांचे वडील प्रताप सरनाईक हे ठाण्यातील ओवळा माजीवडा मतदारसंघाचे आमदार आहेत) यांच्या विनंतीनुसार युवासेनेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात विश्वजीत यांना प्रमोशन देण्यात आले. त्यांना प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.