Tushar Gandhi file case : संभाजी भिडेंविरोधात तुषार गांधींची न्यायालयात धाव ; पोलिसांवरही राजकीय दबावाचा दावा...

Sambhaji Bhide News : संभाजी भिडे यांनी म. गांधींबद्दल अमरावतीच्या जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती.
Tushar Gandhi file case :
Tushar Gandhi file case :Sarkarnama

Pune Political News : महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी म. गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी आता पुणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दोन महिन्यांपूर्वी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी म. गांधींबद्दल जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. त्यानंतर राज्य भरात संभाजी भिडेंविरोधात गुन्हे दाखल झाले. खुद्द म. गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात भिडेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. पण पुणे पोलिसांनी कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर तुषार गांधी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

याबाबत बोलताना तुषार गांधी म्हणाले, आम्ही दोन महिन्यापूर्वी संभाजी भिडेंविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. पण पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही पुणे पोलिस आणि भिडेंविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. पुणे पोलिसांवर राजकीय दबाव असल्याने ते आपले कर्तव्य करू शकत नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

Tushar Gandhi file case :
Devendra Fadnavis On Shivsena UBT : आम्ही केलेल्या घोषणा पुर्णच केल्या, तुम्ही अडीच वर्ष माशा मारत होतात का ?..

तुषार गांधी, त्यांचे वकील आणि इतर काही लोकांनी डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात संभाजी भिडेंविरोधात दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणे, महापुरुषांची बदनामी करणे, आणि चिथावणीखोर वक्तव्ये करणे, या अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

'भिडेंनी केवळ बापूंविरुद्धच नव्हे, तर आपल्या कुटुंबाविरुद्धही अपमानास्पद टिप्पणी केली होती.' जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना भिडेंनी महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी भिडेंविरोधात अमरावती आणि नाशिकमध्ये एफआयआर दाखल केला होता.

काय म्हणाले होते संभाजी भिडे?

"मोहनदास गांधी हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे अपत्य होते. करमचंद गांधी एका मुस्लीम जमीनदाराकडे नोकरी करायचे. पण ते त्याच जमीनदाराचे पैसे घेऊन ते पळून गेले. त्यामुळे चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद गांधींच्या पत्नीला पळवून आणलं आणि त्यांना घरी आणून त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नाहीत. त्यांचे वडील मुस्लीम जमीनदार आहेत," असे वादग्रस्त विधान भिडेंनी केला होते.

Edited By- Anuradha Dhawade

Tushar Gandhi file case :
Wai Police News : आयपीएस कमलेश मीना यांचा वाईत व्यसनमुक्तीचा अनोखा पॅटर्न

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com