Uddhav Thackeray Birthday News : ठाकरेंच्या वाढदिवसाचा फलक झळकला काश्मीरच्या पर्वतावर; शिवसैनिकाच्या अनोख्या शुभेच्छा!

Shivsainik Wishes To Uddhav Thackeray : यावेळी श्री बाबा बर्फाणीच्या चरणी ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
Uddhav Thackeray Birthday News
Uddhav Thackeray Birthday NewsSarkarnama

Kashmir News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. ठाकरेंवर शिवसैनिकांकडून शुभेच्छांची बरसात होत आहे. विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंना शुभेच्छा देत आहेत. मात्र एका कट्टर शिवसैनिकाने ठाकरेंना दिलेल्या अनोख्या शुभेच्छांची एकच चर्चा सुरू आहे. काश्मीरमधील बर्फाळ पर्वतावर ठाकरेंचा वाढदिवसाचा फलक झळकला आहे. (Uddhav Thackeray Birthday News)

Uddhav Thackeray Birthday News
Uddhav Thackeray Interview : ठाकरे-शिंदेंच्या संघर्षात 'खेकड्या'ची एन्ट्री ! आता कोण कुणाला नांगी मारणार ?

आंबेगाव येथील माजी सरपंच व कट्टर शिवसैनिक दत्ता गांजाळे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट काश्मीर मध्ये बर्फाच्या पर्वतावर अमरनाथ येथे शुभेच्छांचा बॅनर झळकावला. यावेळी घोषणा देऊन ठाकरेंना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री बाबा बर्फाणीच्या चरणी ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही त्यांनी केली.

Uddhav Thackeray Birthday News
Sharad Pawar : शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाची नोटीस; आता पवार काय भूमिका घेणार ?

दत्ता गांजाळे शिवसैनिक असून गेली 20 वर्षांपासून ते दरवर्षी आंबेगाव तालुक्यातील आपल्या सहकाऱ्यांसह अमरनाथ दर्शनाला जात असतात. उध्दव ठाकरे यांचा आज (27 जुलै) वाढदिवस आहे. यासाठी काल बुधवारी दत्ता गांजाळे हे अमरनाथ या ठिकाणी उपस्थित होते.

गांजाळे व त्यांच्या मित्रांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाचा शुभेच्छा देणारा बॅनर झळकवला. घोषणा देत श्री बाबा बर्फानी चरणी उध्दव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com