Pune Lok Sabha constituency : पुणे लोकसभा निवडणुकीची अनिश्चितता कायम; तरीही प्रशासनाची तयारी पूर्णत्वाच्या मार्गावर !

Election Commission of India : तयारीचा आहवाल मिळाल्यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेणार
Girish Bapat, Pune Loksabha Constituency
Girish Bapat, Pune Loksabha ConstituencySarkarnama

Pune By Election News : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने काही दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदान साहित्याची माहिती मागविण्यात आली आहे. दरम्यान, बंगळूरुहून चार हजार २०० ईव्हीएम मशीन्स पुण्यात आणल्या आहेत. ही पोटनिवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवरच प्रशासनाने निवडणुकीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.

कर्नाटकातील विधानसभा निवडणूक संपल्यानंतर बंगळूरुहून (Karnataka) ईव्हीएम मशीन्स, पाच हजार ७० व्हीव्हीपॅट पुण्यात आणण्यात आल्या आहेत. या मशिन्सवर पुणे पोटनिवडणूक (Pune By Election) असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. तसेच तीस इंजिनिअर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मतदार याद्या अद्यायावत करणे, मतदान केंद्रे निश्चित करण्याची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, या पोटनिवडणुकीबाबत अद्याप कोणतीही सूचना प्राप्त झालेली नसल्याची माहिती पुणे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. असे असले तरी या निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

Girish Bapat, Pune Loksabha Constituency
Opposition's MPs And New Parliament : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी 352 खासदारांची उपस्थिती; 191 जणांचा बहिष्कार !

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मतदान केंद्रे, साहित्य आणि अन्य माहितीसाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार २६ मे राजी केंद्रीय निवडणूक आयोगाला तयारी पूर्ण झाल्याचा आहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. या आहवालानंतर निवडणूक आयोग कधीही पुण्याची पोटनिवडणूक जाहीर करू शकते.

भाजपकडून 'ही' नावे चर्चेत

गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने पुणे लोकसभा मतदारसंघ रिक्त झाला आहे. या जागेवर आता पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी तीन नावांची चर्चा सुरू आहे. या तीन जणांपैकीच एकाला तिकीट मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे.

Girish Bapat, Pune Loksabha Constituency
Eknath Khadse News : फर्दापूर रेस्ट हाऊसवर 'सुंदरी, मदिरा अन् मिनाक्षी'चे किस्से; महाजनांना खडसेंनी पुन्हा डिवचलं

पु्ण्याचे (Pune) खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा रिक्त झाली आहे. पुण्याची पोटनिवडणूक होणार नाही, असे बोलले जात होते. पुढच्या मे २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे ही निवडणूक न होता, ही जागा रिक्त ठेवली जाणार अशी चर्चा होती. मात्र प्रशासनाकडून या निवडणुकीसाठी तयारी करण्यात आहे. मतदान केंद्राची चाचपणी करण्यात येत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचा दावा

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं पुणे लोकसभा निवडणुकीची (Pune Loksabha By Election) जोरदार तयारी सुरु आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसही पुणे लोकसभा लढविण्यासाठी आग्रही भूमिकेत असल्याचे समोर आलं आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाचे भावी खासदार म्हणून बॅनरही पुण्यात झळकले होते. आता आघाडीकडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. यामुळे आता भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्याकडून कोणत्या नेत्यांनी लोकसभेचं तिकीट मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com