Opposition's MPs And New Parliament : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी 352 खासदारांची उपस्थिती; 191 जणांचा बहिष्कार !

New Parliament : नवीन संसदेच्या उदघाटनावरून देशातील राजकारण तापले
News Parliament Building, Narendra Modi, Rahul Gandhi
News Parliament Building, Narendra Modi, Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

New Parliament Inauguration News : संसदेच्या नवीन इमारतीच्या २८ मे रोजी होणाऱ्या उद्घाटनावरुन विरोधी पक्षांतील नेते केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. नवीन संसदेचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हायला हवे, अशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला आहे. त्यानुसार विरोधी पक्षातील एकूण १४६ खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. तर एकूण ४३ खासदार असलेल्या पक्षांना अद्याप निर्णय जाहीर केला नाही.

काँग्रेस (Congress), आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस शिवसेना-उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक, समाजवादी पक्ष, भाकप, माकप, झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ काँग्रेस (मणि), विदुथलाई चिरुथिगल कच्ची (व्हीसीके), राष्ट्रीय लोकदल, जनता दल (सं), इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फरन्स, रिव्हॉल्युशनरी सोशलिस्ट पक्ष, एमडीएमके या विरोधी पक्षांनी बुधवारी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करून बहिष्काराची भूमिका स्पष्ट केली. या पक्षांच्या खासदारांची एकूण संख्या १४६ आहे.

News Parliament Building, Narendra Modi, Rahul Gandhi
Eknath Khadse News : फर्दापूर रेस्ट हाऊसवर 'सुंदरी, मदिरा अन् मिनाक्षी'चे किस्से; महाजनांना खडसेंनी पुन्हा डिवचलं

दरम्यान, विरोधी पक्षातील तेलंगणातील सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल या पक्षांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. या पक्षांच्या एकूण खासदारांची (MP) संख्या ४३ आहे. नविन संसद इमारतीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेले आणि भूमिका स्पष्ट केली नसलेल्या पक्षांच्या खासदारांची संख्या १९१ होत आहे. यात पुणे आणि वायनाडच्या रिक्त जागांचाही समावेश आहे.

News Parliament Building, Narendra Modi, Rahul Gandhi
Daund APMC News : ...म्हणून दौंड बाजार समितीमध्ये आमदार राहुल कुलांना मिळाली सत्ता; राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदाच धक्का

माजी केंद्रीय मंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टी (टीडीपी), शिरोमणी अकाली दल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस या पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची घोषणा केली आहे. तसचे बीजेडी, अपना दल, एजेएसयू, एआयडीएमके, एआययूडीएफ, जेडीएस, मिझो नॅशनल पार्टी, नाना पीपल्स फ्रंट, एनडीपीपी, आरएसली, आणि एसकेएमचे खासदार सहभागी होणार आहेत. त्यामुळे उघाटनाला एकूण ३५२ खासदार उपस्थित राहणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com