Pcmc News : भाजपकडून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा समारोप की निवडणूक प्रचाराची सुरवात?

Pimpri-Chinchwad BJP News : देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव भाजपने गेल्यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात सुरु केला.
Shankar Jagtap News
Shankar Jagtap NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News : देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव भाजपने गेल्यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात सुरु केला. त्याचा समारोप ते ९ ते १५ ऑगस्टदरम्यान तसाच जोरात करणार आहेत. त्यात पुन्हा एकदा 'घर घर तिरंगा' ही मोहीम ते घेणार असून त्यात आपापल्या घरांवर पुन्हा तिरंगा फडकवला जाणार आहे.

घर, घर..च्या जोडीने 'मेरी मिट्टी, मेरा देश' हा कार्यक्रम घेण्यास भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देशातील सर्व जिल्हाध्यक्षांना यावेळी सांगितले आहे. त्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मान केला जाणार असून त्यांच्या नावाची शिला लावली जाणार आहे. तो पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) सुद्धा घेतला जाणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप (Shankar Jagtap) यांनी पत्रकारपरिषद घेऊन शनिवारी सांगितले.

Shankar Jagtap News
Sujay Vikhe Patil News : लव्ह जिहादवरुन सुजय विखे आक्रमक; संसदेत भूमिका मांडणार

पक्षाच्या विधानपरिषद सदस्या उमा खापरे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनुप मोरे, युवा नेते अमित गोरखे आदी यावेळी उपस्थित होते. मेरा मिट्टी.. कार्यक्रमांतर्गत शहरातील मातीचा कलश हा जिल्हाधिकाऱ्यांना दिला जाणार आहे. या समारोपात १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभिषिका स्मृती दिवस पाळला जाणार असून त्यादिवशी मूक मिरवणुका काढल्या जाणार आहेत. फाळणीच्या कटू आठवणीही सांगितल्या जाणार आहेत.

Shankar Jagtap News
Kishor Patil News : पत्रकाराला शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे आमदार पाटील म्हणतात... ही बाळासाहेबांची स्टाईल

आठवडाभर राष्ट्रभक्तीमय वातावरण निर्मितीचे कार्यक्रमही होणार आहेत. ही सर्व तयारी आगामी महापालिका निवडणुकीची आहे का अशी विचारणा केली असता भाजपचे (BJP) पिंपरी पालिकतील माजी पक्षनेते नामदेव ढाके यांनी थेट उत्तर दिले नाही. गेल्यावर्षी सुरु झालेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपाचा हा एक भाग असल्याचे ते यावेळी म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com