Murlidhar Mohol News : केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केली, चांदणी चौक ते हिंजवडी मार्गावरील मेट्रोची गरज, म्हणाले...

Muralidhar Mohol visited Metro office : सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रोचे ऑगस्टमध्ये उद्‌घाटन होणार असल्याचीही दिली माहिती.
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama

Muralidhar Mohol And Pune Metro News : केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो होण्याची गरज व्यक्त केली आणि सिव्हील कोर्ट ते स्वारगेट दरम्यानच्या मेट्रोचे ऑगस्टमध्ये उद्‌घाटन होणार असल्याचेही सांगितले आहे.

"चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावर मेट्रो होण्याची गरज आहे. पुणे बंगळुरू या महामार्गावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी हा मार्ग आवश्‍यक आहे. या मार्गाचा नव्याने समावेश करण्याची सूचना मी केलेली आहे. अन्य प्रस्तावित मार्गांना कॅबिनेटमध्ये अंतिम मंजुरी देण्यासाठी पाठपुरावा करू.' अशी माहिती मंत्री मोहोळ यांनी दिली आहे.

चांदणी चौकातून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात पुणे व पिंपरी -चिंचवड शहरात ये-जा सुरू असते. त्यामुळ महामार्गावर वाहतूकीचा ताण मोठा असतो. भविष्यात शहरात महामेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम होईल, त्यामध्ये चांदणी चौक ते हिंजवडी मेट्रो मार्ग केल्यास प्रवाशांची सोय होईल, समाजाच्या शेवटच्या माणसाला मेट्रोतुन प्रवास करता आला पाहीजे, असेही मोहोळ यांनी सांगिले.

Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Oath : मुरलीधर मोहोळांसह महाराष्ट्रातील 'या' मंत्र्यांनीही संसदेत शपथ घेताना जपला 'मराठी बाणा'!

मेट्रोच्या शिवाजीनगर येथील कार्यालयास मोहोळ यांनी सोमवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास भेट देऊन मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त शेखर सिंग, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोच्या कामाची सद्यःस्थिती, प्रस्तावित प्रकल्प व विविध उपक्रमांबाबतची माहिती दिली.

मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) म्हणाले, "मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या साडे तीन किलोमीटरच्या टप्प्याचे ऑगस्ट महिन्यात उद्‌घाटन होणार आहे. दोन स्टेशन आता सुरू होतील, उर्वरीत एक स्टेशन नंतर सुरू होईल. येरवडा स्टेशनचेही काम आता पूर्ण होणार आहे. वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली या नवीन प्रस्तावित 3 हजार 756 कोटी रूपयांच्या मार्गाचा प्रस्तावही मंजुरीसाठी कॅबिनेटमध्ये आलेला आहे.'

Murlidhar Mohol
Murlidhar Mohol : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज ठाकरेंची भेट; पाहा खास फोटो

'त्यास लवकर मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. निगडी ते पिंपरी चिंचवडचे साडे चार किलोमीटरचे विस्तारीकरण आहे. स्वारगेट ते कात्रज मार्गाचा प्रस्ताव आहे, हे विषय कॅबिनेटच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी आलेले आहेत. त्यास लवकरच मान्यता कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करू. पुढील काळात लोकप्रतिनिधी व महामेट्रोकडूनही अनेक मार्गांच्या विस्तारीकरणासाठीचे नियोजन केले आहे. त्या मार्गांचीही माहिती घेतलेली आहे.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com