
Vaishnavi Hagavne Case : वैष्णवीच्या कुटुंबीयांनी हुंड्यात दिलेल्या गाडीवरुन अजित पवार यांनी लग्नातच शंका उपस्थित केली होती का? याबाबत वैष्णवीच्या मामांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. वैष्णवीच्या कुटुंबाने हुंड्यात हगवणे कुटुंबाला 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची सात किलोची भांडी दिली. श्रावण मासाला अंगठी अधिक मासाला चांदीचं ताठ दिल्याचं वैष्णवीच्या मामांनी सांगितलं. फॉर्च्युनर गाडीची चावी अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आली होती असंही त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले दोघांचे लव्हमॅरेज होते. या लव्ह मॅरेजला घरातील सगळ्यांचा विरोध होता. सगळे म्हणत होते की, हे लग्न करायचे नाही. परंतु वैष्णवी माझ्याकडे सातत्याने शंशाक सोबत लग्न करायचे आहे, असे सांगत होती. तुम्ही घरच्यांना काहीतरी समजून सांगा, मला त्याच्यासोबतच लग्न करायचे आहे असं ती मला म्हणायची. हगवणे कुटुंबाने तिच्यावर काय जादू केला, तिला पूर्ण संमोहीत केलं होते, त्यामुळे ती ऐकवण्यास तयार नव्हती. त्याच्यासोबत लग्न करायचं असं ती वारंवार म्हणत होती.
मग एक दिवस घरात वाद झाले. त्यावेळी वैष्णवीच्या वडिलांची तब्येत बिघडली असताना ते आयसीयूमध्ये होते. त्यावेळी शशांक येथे आला. त्याने वैष्णवीला फोन करुन सांगितलं की, तू आत्ताच्या आता माझ्यासोबत चल, मी तुला घेऊन जाणार आहे. मग तीने माझा मुलगा प्रणवला मॅसेज केला. की, मी आता शशांक सोबत पळून चालले आहे. त्यावेळी प्रणवने तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, तू वेडी आहेस का. तुझे वडील आयूसीयूमध्ये आहेत आणि तू असा निर्णय घेत आहेस.
प्रणवने लगेच मला सांगितलं आणि मी हॉस्पिटलमधून घरी आलो. तीला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तीचा निर्णय ठाम होता. मी जाणारच असं ती म्हणाली. तीला आम्ही समजून सांगितलं. दोन्ही मामा बोलताय आपण नंतर निर्णय घेऊ असं त्याला सांग म्हणून सांगितलं. आपली समाजात इज्जत जाईल असं सांगितलं होतं.
पण इतकं समजावूनही तिने शेवटी हे लग्न केलेच. लग्नानंतर सहा महिन्यांतच सगळं बदललं. घरात सतत कलह, मारहाण, मानसिक छळ सुरू झाला. तेव्हा वैष्णवी मला म्हणाली मामा माझी चूक झाली. ते शब्द आजही मनात खोलवर कोरले गेलेत. तीला पश्चाताप झाला होता, पण वेळ निघून गेली होती असे मामांनी सांगितले.
यावेळी त्यांनी हगवणे कुटुंबीयांवर आरोप करत वैष्णवी हगवणे हिचा झालेला संशयास्पद मृत्यू हा हुंडाबळीचाच प्रकार असल्याचे म्हटलंय. ते म्हणाले, या घरातच त्यांच्या लग्नाची बैठक झाली. त्यावेळीच आनंद कस्पटे (वडिल) म्हणाले की मला तुम्हाला मुलगीच द्यायची नाही. मात्र तरीही हगवणे कुटुंबियांनी भांडून गाडी घेतली. आम्ही त्यांच्यासाठी MG हेक्टर गाडी बुक केली होती, पण त्यांनी ते बुकींग कॅन्सल करुन फॉर्च्युनरच द्या अशी मागणी केली. माझ्यासोबत भिकारी पोरं फिरतात, त्यांच्याकडे मोठ्या गाड्या आहेत. त्यामुळे मला फॉर्च्युनरच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. सोन्याची पण तशीच मागणी झाली असं मामांनी सांगितलं. १ लाख वीस हजारांच घड्याळ मागवून घेतलं असंही त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले, वैष्णवी आणि शशांकच्या लग्नासाठी अजित पवारही उपस्थित होते. फॉर्च्युनर गाडीची चावी त्यांच्या हस्तेच दोघांना देण्यात आली होती. तेव्हा अजित पवारांनी वैष्णवीच्या बाबांना एक प्रश्नही विचारला होता, तुम्ही गाडी दिली का राजेंद्र हगवणे यांनी तुमच्याकडे गाडी मागितली होती? त्यांच्या या शब्दातंच सगळं काही आल्याचं मामा म्हणाले. आता आमची अजित पवारांकडे एकच मागणी आहे, तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या. हगवणे कुटुंबाला जास्तीत जास्त शिक्षा मिळाली पाहिजे, वैष्णवीला त्यांनी मरण्यासाठी प्रवृत्त केलं आहे, असा आरोपही तिच्या मामांनी केला.
तीला जी अमानुष मारहाण झाली ती न बघण्यासारखी होती. डॉक्टरांनी त्याचवेळी सांगितलं की, ती घरातच गेलेली आहे. असं तीच्या मामांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.