MNS News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर आता महिला आयोगाबाबत 'मनसे'चीही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!

MNS complaint about Women Commission : जाणून घ्या, मनसेनी नेमकी कोणत्या मुद्य्यावरून महिला आयोगाची तक्रार केली आहे?
MNS News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर आता महिला आयोगाबाबत 'मनसे'चीही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!
sarkarnama
Published on
Updated on

MNS files complaint to CM regarding Women Commission : वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी पक्षाने आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राजेंद्र हगवणे यांची मोठी सून मयुरी हगवणे हिच्या तक्रारी बाबत महिला आयोगाने योग्य भूमिका घेतली असती, तर वैष्णवी हगवणे प्रकरण घडलं नसतं. असा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे. तसेच आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील करण्यात येत आहे.

अशातच आता मनसेने देखील मुख्यमंत्र्यांकडे महिला आयोगाची तक्रार केली आहे. अडचणीत असलेल्या महिलांना तातडीची मदत मिळावी यासाठी राज्य महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त हेल्पलाईन क्रमांक सुरू केला होता. मात्र सध्या आयोगाचे अधिकृत संपर्क क्रमांक (022) 26592707 आणि हेल्पलाईन नंबर 155209 हे दोन्ही बंद असल्याचं समोर आलं आहे.

या क्रमांकावर संपर्क साधला असता हा नंबर"डझ नॉट एक्झिस्ट" असा मेसेज या ऐकायला मिळत आहे. त्यामुळे फोनवरतरी महिला आयोगाबाबत ''Dose Not Exist" असा अनुभव अनेक तक्रारदार महिलांनी घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून या गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे.

MNS News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर आता महिला आयोगाबाबत 'मनसे'चीही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!
Bangladesh political crisis : युद्धजन्य परिस्थिती!, युनूस यांचा हट्ट अन् लष्कराचा दबाव ; अखेर कोणत्या दिशेने जातोय बांगलादेश?

हा हेल्पलाइन नंबर बंद असेल तर सामान्य महिलांनी संकटाच्या प्रसंगी मदतीसाठी कोणाकडे जायचं? सरकारी यंत्रणा अस्तित्वात असताना जर संपर्कच होत नसेल, तर त्या यंत्रणेचं अर्थ काय?" असा प्रश्न मनसे पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करत थेट महिला आयोगाची तक्रार केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोग कटीबद्ध असल्याची फक्त पोकळ घोषणाच असून वास्तव्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारास वाचा फुटणारच नाही, असा खेद या पत्रामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

MNS News : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर आता महिला आयोगाबाबत 'मनसे'चीही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार!
Ajit Pawar in Baramati : बारामतीला पावसाचा जबरदस्त फटका अन् अजितदादा तत्काळ ॲक्शन मोडवर!

या संपूर्ण प्रकरणावर अद्याप महिला आयोगाने किंवा सरकारकडून अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र मनसेकडून थेट मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवल्यामुळे आता या प्रकरणात मुख्यमंत्री नेमकी काय कारवाई करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com